अलिकडे मी एक वेगळा सल्ल्ला ऐकला. माझ्या महाविद्यालयाच्या प्राचार्या मला काही काम सांगत होत्या. मी माझ्या मनातील (त्या कामाच्या) तपशीलाविषयी बोलत होतो. मला त्यांनी तुमच्या अडचणी सांगू नका, काम दाखवा असा शेरा ऐकवला. नंतर बराच वेळ त्या मला त्याच कारणावरून डाफरत राहिल्या. त्यांची शेरेबाजी ऐकत असताना मला पडलेला प्रश्न मी आपणां सर्वांसमोर ठेवित आहे. त्यांच्या मताप्रमाणे काम सांगितल्यानंतर कर्मचाऱ्याने ते केलेच पाहिजे. कारणे सांगणे, अडचणी मांडणे म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग तर काम सांगितल्यानंतर ते पूर्ण करून दाखवणे हे पॉझिटिव्ह थिंकिंग होय. पॉझिटिव्ह थिंकिंग व निगेटिव्ह थिंकिंग या संकल्पना खरोखर काय आहेत हे मला अजूनही कळलेले नाही. या संकल्पना नेमक्या काय आहेत?