जखम

भरत नाही जखम आता
काळ नाही मलम आता

शेवटी तलवार जिंके
हार जाते कलम आता

रोज शपथा मोडतो, पण
वाटते ना शरम आता

कां तुझ्या माझ्यात नाही?
ते तहाचे कलम आता

मान खाली, म्यान शस्त्रे
रक्त नाही गरम आता

--------------------------------------- जयन्ता५२