केळी आणि हत्ती

मंडळी,


हे घ्या एक सोपे कोडे -


तुमच्या जवळ ३००० केळी आणि ५ हत्ती आहेत. ती तुम्हाला पुण्याहून दिल्लीपर्यंत (१००० कि.मी धरा) न्यायची आहेत. पण -


१. एक हत्ती जास्त्तीत जास्त १००० केळी नेऊ शकतो.


२. प्रत्येक कि.मी. नंतर एका हत्तीला एक केळे लागते. नाहीतर तो पुढे जाणार नाही.


३. हत्तीला तुम्ही वाटेतच सोडू शकता.


सांगा पाहू तुम्ही जास्त्तीत जास्त किती केळी दिल्ली पर्यंत न्याल ?


उत्तर व्य. नि. पाठ्वा. नंतर मी सांगेनच.


- मोरू