हा तारा कोणता?

सध्या इथे, म्हणजे मुंबई परिसरांत रात्री ८.३०- ९.३० च्या सुमारास एक प्रखर तेजस्वी तारा पश्चिम क्षितिजावर दिसतो. हा तारा सहजगत्या नजरेत भरण्या इतका तेजस्वी आहे. हा तारा कोणता असावा? खगोलशास्त्राचा/ आकाशनिरिक्षणाचा छंद जोपासणारे मनोगती सांगू शकतील का?

P1010035

परवा रात्री टिपलेले हे प्रकाशचित्र. या चित्रात दिसते आहे की तो तारा चंद्रकोरीच्या बराच जवळ आहे, व तुलना करता त्याचे तेज व आकार चंद्राच्या तुलनेत देखिल जाणवण्यासारखे आहे.