भुताटकी

भूताटकी ...
(कृपया हे सदर रात्री १२ ते पहाटे ५ ह्या वेळेतच वाचावे . )

वैज्ञानिक इशारा - हृदयविकार आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तिंनी हे सदर वाचण्याआधी कृपया तज्ञांचा सल्ला घ्यावा .

ह्या सदरातील सर्व पात्रे ही काल्पनिक आहेत .त्याचा कुणाच्याही वैयक्तिक जीवनाशी कुठलाही संबंध नाही.तसे आढळल्यास ती निव्वळ भुताटकी समजावी !!!

भूत !!! सगळ्यांच्या रात्रीच्या च्रर्चेचा आवडता विषय ,तुम्ही पाहीलय का कधी एखादं ,मी पाहीलयं ....घरच्या आरशामध्ये .....अहं....तसं नव्हे....घरी भूत हा चित्रपट पहात असताना ,त्यामधल्या आरशामध्ये   ...

गमतीचा भाग सोडा ;भूत तस मी पाहीलं नाही ,पण पहाण्याचा बरेचदा प्रयत्न मात्र केलाय ,पण त्यालाच भेटायला वेळ नाही म्हणे ...बरेचदा त्यांच कामकाज 'ऐकण्याची' परवानगी मात्र त्यांनी मला मुक्तह्स्ते दिली...

त्याचं असं आहे की ,मला एकेकाळी रात्री बेरात्री अभ्यास करण्याची सवय होती .मला रोज रात्री आमच्या छतावरून घरंगळत जाण्या-या गोटीचा आवाज यायचा (भूतं पण गोट्या खेळतात !!!), त्याचवेळेला मांजर पण कण्हायचे आणि थोड्या वेळेनंतर गुरख्याच्या काठी आपटण्याचा यायचा... आधी लांबून ....मग जवळून आल्यासारखा वाटायचा ....मग पुन्हा लांब जायचा....गॅलरीतून कित्येकदा पहायचा प्रयत्न केला पण कधीच कुणीच दिसलं नाही ....आहे की नाही भूताटकी !!!

तुमच्याबाबतीत असं कधी झालय का ?? माझी आणि भूताची खास अशी मैत्री नाही ,त्यामुळे त्याचे फारसे किस्सेही नाहीत पण तुमच्या कडून ऐकायला नक्की आवडतील ....काय मगं ....कधी घाबरवताय  ??