मराठी भाषा आणि संगणक

मराठी भाषा आणि संगणक  या विषयावर चर्चा व्हावी.

कविता, गझला लिहता येवू शकेल ? सॉफ्ट्वेअर आले आहे.

शुभानन गांगल यांचे विचार आणि संशोधन !

संगणकातून मराठी हा मराठी माणसाचा 'जन्मसिद्ध हक्क'

नमस्कार,
संगणकातून मराठी वापरायला मिळणे हा मराठी माणसाचा 'जन्मसिद्ध हक्क समजला जावा"! संगणकीय तंत्रज्ञान हे संगणकात उमटू शकणार्‍या भाषेच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. जर भाषेला मायक्रोसॉफ्ट रचनांचा अनुभव संगणकातून घेता आला नाही तर तो भाषीक मागासलेला ठरू लागेल अशी आजच्या आधूनिक युगाची रचना आहे. संगणकातील विंडोजमधल्या वर्डस्, एक्सेल, पेजमेकर, कोरलड्रॉ, फोटोशॉप, या सर्व रचनांत हा फॉण्ट कुठेही विरूप न होता कार्यरत होतो. १)ईमेल मधून फॉण्ट पाठवता यावा, २)केवळ कॅपीटल आणि स्मॉल की-वरच तो बसावा, ३)वेबवरून मराठी अभिप्राय लिहीता यावा, ४)विंडोजमधल्या रचनांचा अधिकांश वापर करता यावा, ५) तो व्हायरस पासून मुक्त रहावा, ६) तो मोफत उपलब्ध व्हावा, यांना प्राधान्य देत तो बनविला आहे.
आपण मला ईमेल करा. मी आपल्याला मराठी आणि हिंदी फॉण्टस् मोफत पाठविन. आपण सर्वांनी एकत्रीतपणे आधूनिक युगात मराठीला योग्य स्थान मिळण्यासाठी प्रयत्न करू या. हे फॉण्टस् लोकांपर्यंत मोफत पोचविण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.
शुभानन गांगल टेलीफोनः ९१-२२-२६२०१४७३ मोबाईलः ९८३३१०२७२७
Link for Group: http://groups.google.co.in/group/shubhanan-gangal/