मन शुद्ध तुझं (२)

ज्या गोष्टी करू नयेत, हे माहित असूनही 'इलाजच नाही' असे म्हण्त, प्रवाहपतिताप्रमाणे, त्या गोष्टी करू नका. ज्या गोष्टी करायला पाहिजेत, त्या गोष्टी जाणूनबुजून, निक्षून करायला सुरुवात करा. याच पद्धतीने सन्मार्गावर राहाल. जो सन्मार्गावर असतो, त्याच्यावर परमेश्वरी क्रुपेचा वर्षाव सुरू होतो.

काही विधायक कार्य करावयास जावे, तर कित्येक जणांना अडचणी सतावतात. लक्षात असू द्या की चांगल्या मार्गावर अडचणी असणे, हा आजकालचा निसर्गधर्मच बनला आहे. अधिकतर लोकांई विचारसरणी बिघडलेली असल्याने त्याची विषारी फळे सदप्रव्रुत्तांना भोगावी लागतात. आपल्या निश्चयाच्या मागे असलेली प्रामाणिकता, धीर, प्रखर विश्वास याची जणू परीक्षाच अशा वेळी द्यावी लागते. या परीक्षेत उतरलात, तर अनुभवाल की विधायक कार्याचा तुम्च निश्चय जितका पक्क असेल, तेव्हढ्याच सहजतेने अडचणीही दूर होतील. स्वतःवर आणि सद्वचनांवर अढळ विश्वास ठेवून कार्य चालू ठेवा. अंतिम ध्येय समोर हवे, जिथे पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहात; आदर्श हवा, ज्याच्यासाठी झटणार आहात. असे कोण्तेचस अंतिम ध्येय नाही, जिथे प्रतिकाराशिवाय पोहोचता येईल, अडचणींशिवाय जे हस्तगत होईल. अशा प्रतिकारामुळे, येणाऱ्या अडचणींमुळे मन सैरभैर होता कामा नये. उलट, त्यातूनच अधिकाधिक शक्ती लाभली पाहिजे, ज्यायोगे आयुष्याची ही लढाई एखाद्या खंद्या वीराप्रमाणे आपणास लढता येईल.

व्यवसाय-धंदा असो वा नोकरी-चाकरी, तुमच्यावर ठराविक जबाबदारी असते. ती जबाबदारी पार पाडण्यासाठीच मोबदला मिळत असतो. मोबदल्याचा हक्क तेव्हढा अबाधित ठेवून जबाबदारीपासून मात्र अंग चोरू नका, दूर पळू नका. तसे कराल तर तुम्ही विश्वासघाताचे पातक माथी घ्याल. आराम मिळविण्याचा तो खरा मार्ग नव्हे. अशा प्रव्रुत्तीतून नेहमी अधिक काळज्या निर्माण होतात. यासाठी आपल्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडावयास हवी. अर्थात मोठेपणाच्या हव्यासापोटी अथवा स्वार्थी पुढाकार घेऊन स्वतःच्या डोक्यावरील जबाबदाऱ्यांचे ओझे वाढवून स्वतःची शांती संपवून घेऊ नका. नसता ताप विकत घेण्यापेक्षा आमच्या हृदयात तीव्र इच्छा हवी ती 'उठता बसता कार्य करता'ना परमेश्वराचे स्मरण आणि चिंतन करीत समर्पण व्रुत्तीने आपले काम करण्याची.डोक्यात विचारांचे थैमान सुरू झाले की मन शांत राहाणार कसे? अलिप्तता विचारांना आळ घालते. म्हणूनच अलिप्तता अंगिकारली पाहिजे.                                 (क्रमशः)