संध्यानंद वर्तमानपत्र

पुणे आणि मुंबई येथून प्रकाशित होणारे, सर्वात जास्त किंमत असणारे, विशिष्ट वाचकवर्गात लोकप्रिय असणारे,  संध्यानंद हे आगळेवेगळे वृत्तपत्र याबद्दल मला चर्चा करायची आहे.

एकूणच कुठेच या वर्तमानपत्राविषयी चर्चा होताना दिसत नाही. कुठे लिहून येत नाही.

विविध सर्वेक्षणाचे निकाल छापून त्याबद्दल उहापोह करणारे हे जगातील एकमेव वर्तमानपत्र असावे. तसेच पान नं. दोन वरचे यशस्वी कसे व्हायचे यासोबतच जीवनात कसे वागायचे याबद्दलचे लेख छान असतात. ते सकारात्मक विचारसरणी निर्माण करण्यास मदत करतात.

ज्योतिषशास्त्राबद्दलचे ही काही मुद्दे यात पान नं. ३ वर मांडलेले असतात.

आरोग्य विषयक, बॉलिवूड विषयक स्वतंत्र पान असते.

सेक्स या विषयावर सुद्धा उघडपणे चर्चा करणारे मराठीतले हे एकमेव बोल्ड, बिनधास्त वर्तमानपत्र आहे. त्याने समाजातल्या अनेक वाईट गोष्टीसुद्धा उघडकीस आणल्या आहेत.

न रुचणारे पण सत्य अशा बातम्या छापत असल्याने ते अनेकांच्या टिकेचे लक्ष्य बनले आहे असे वाटते.

भारतीय संस्कृतीचा आपण अभिमान बाळगत असलो तरी भारतातच छुपेपणाने घडणाऱ्या वाईट सत्य घटना आपल्याला यात कळतात. सत्य कडू असते. आणि म्हणून ते कदाचीत आवडत नाही, म्हणून टिका होते.

या वर्तमानपत्राविषयी आपल्याला काय वाटते? हे माझ्यासारख्या संध्यानंद च्या  एका सामान्य वाचकाला जाणून घ्यायचे आहे.