आम्लपित्त आणि अपचनावर घरगुती उपाय

मी सध्या परदेशात आहे. इथे मागील ६ महिन्यांपासून थंडी आहे. (सुमारे-२० ते ७ अंश तापमान). त्यामुळे बऱ्याच भारतीयांना आम्लपित्त आणि अपचन याचा त्रास होतो आहे. आयुर्वेदिक औषधे चांगली असली तरी उपलब्ध नाहीत. किंवा भारतातून कोणी येणार असेल तरच मिळू शकतात.

१. या व्याधींकरिता घरगुती उपाय आहेत का ?

२. जसे प्राणायामाने पोट (लठ्ठपणा) कमी होतो तसा आम्लपित्त आणि अपचनासाठी काही योगासने/ प्राणायाम आहेत का ?

३. थंड प्रदेशात राहण्याऱ्यांनी मसाले खाऊच नये का ? त्याचा काही परिणाम होतो का ?

४. गरम पाणी पिल्याने काही फायदा/ नुकसान होतो का ?

आगाऊ धन्यवाद.