'प्रिय' असे मी तुज म्हणू, की 'सुंदरी'? 'मनमोहिनी' ?
काय तुज पत्रात संबोधू? व्यथित झालो मनी१
ग वाचुन प्रेमपत्र माझे
नको जाऊस रागवुन तू
कि, मम संजीवनी तू
ग माझी स्वामिनी तू ।ध्रु।
म्हणालो चंद्र तुज असतो
परी त्यावरहि डाग आहे
म्हणालो सूर्य तुज असतो
परी त्यावरहि आग आहे
तुला इतकेच म्हणतो की,
मज असे - प्रेम तुजवरी - प्रेम तुजवरी - प्रेम तुजवरी ।१।
ग वाचुन प्रेमपत्र माझे ...
मला तू वाटसी गंगा
मला तू वाटसी यमुना
निकट हृदयास तू इतकी
कि 'तू माझीच' - येत मना
जरी मेलो, तरी भटकेल
आत्मा - बघत वाट तव - बघत वाट तव - बघत वाट तव ।२।
ग वाचुन प्रेमपत्र माझे ...
टीपा :
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले
) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
चाल : मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल
)
१. ही द्विपदी मूळ चालीत नाही. मूळ गाण्यात येथे मुक्तछंदातल्या ओळी आहेत. (असे मला वाटले)
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे
शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका
काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)