पु. ल. कालबाह्य ?

पद्मश्री पु . ल. देशपांडे यांचा जन्मदिन या महिन्यात आल्यामुळे त्यांच्याविषयी सर्वच वर्तमानपत्रात लेख आले आहेत हे स्वाभाविकच आहे‍. ज्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राच्या मनावर पन्नासाहून अधिक वर्षे अधिराज्य केले व अजूनही त्यांच्या आठवणी झाल्याशिवाय दिवस जात नाही त्या व्यक्तिमत्वाच्या आठवणी जाग्या होणे स्वाभाविकच आहे. एका वृत्तपत्रात "पु. ल. कालबाह्य झाले आहेत काय ? "अशा अर्थाचा लेखही आला होता व त्यात पु. ल. कालबाह्य होऊ शकत नाहीत असे ठामपणे प्रतिपादित केले आहे  पण अलीकडे यू ट्यूबवर पु. ल. यांचे " माझे पौष्टिक जीवन " किंवा "पाळीव प्राणी " अशा विनोदी लेखांचे त्यांनीच केलेले सादरीकरण पाहिले त्यावेळी पूर्वी इतके ते मनाची पकड घेत नाही असे जाणवले. कदाचित हा माझाही दोष असू शकेल. याउलट चिं. वि. जोशींचे विनोदी साहित्य वाचल्यावर अजूनही तेवढेच हसू येते. विशेषतः चिमणराव व गुंड्याभाऊ यांचे विनोदी प्रसंग ! तो ताजेपणा पु̮. ल. यांच्या विनोदी लेखनात जाणवत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मनोगतींना यावर काय म्हणावे वाटते ?