मी आणि शाळेतील गमती

नमस्कार मित्रांनो,


मनोगतवर आज गमती जमती वाचनात आल्या...


माझ्या आयुष्यात झालेल्या काही गमती देत आहे ...


 बघा हसवतात काय ते...( शुद्धलेखनाच्या चुका माफ असाव्यात)


सर्वात पहिलि ... माझ्या लक्षात असणारी... माझी आवडती


साल :- १९८७


स्थळ:- स्वामी मुक्तानंद हायस्कुल   इयत्ता:- २ री


माझ्या गमतीचे साक्षीदार....(गमतीचे पेक्षा फजितीचे म्हणा)


वर्गशिक्षिका :- सावंत बाई  आणि सर्व वर्ग मित्र/ मैत्रिणि.


बरेच दिवस बाई सांगत होत्या पाढे पाठ करुन या.


पण बाईंचे एकेतील तर ती मुले कसली...


सरतेशेवटी बाईंनीही धमकी दिली ..जर उद्या पाढे पाठ करुन नाही आलात तर ; पालकांना बोलावले जाईल, वर्गात बसु दिले जाणार नाही... वगैरे वगैरे ...


दुसऱ्या दिवशी बाईनी वर्गात आल्या...


पहिल्याच रांगेत पहिलाच मी...


पण बाईंनी विरुध्द बाजुच्या रांगेकडुन सुरवात केली.


मला वाटले चला आज नशिब जोरवर आहे आपला नंबर उद्या येणार.


पण मी माझ्या मित्रांना नाही ओळखु शकलो...


वर्गात रांगा चार ... नागमोडी वळणे घेत (सुरवाती पासुन शेवटी ... शेवटुन पुन्हा सुरवातीला ...)  माझा नंबर आलाच.. तोहि सर्वात शेवटी...


कोणी ४ पर्यंत कोणी ५ पर्यंत पाढे पाठ करुन आले होते...


माझा नंबर आला वर्गासमोर उभा रहिलो.


बाई:- हं भालचंद्र बोल किती पर्यंत पाढे पाठ केले आहेस...


( इकडे भालचंद्रची हवा गुल झाली होती.)


मी :- बाई २० पर्यंत


( बाईंच्या चेहऱ्या वरचा आनंद आजहि डोळ्यासमोर येतो..)


बाई:- (मला सर्व वर्गासमोर उभे करुन) बघा ह्याला बघा ... नाहितर तुम्हि ...ह्याचे २० पर्यंत पाढे पाठ आहेत. आत सर्वांनी शांत बसुन ऐका. हं भालचंद्र सुरु कर.


मी :- बे एके बे, बे दुनी चार,.... , बे दाहे वीस.


बाई:- पुढे बोल


मी :- बाई इतकेच येतात २० पर्यंत


( बाईंच्या चेहऱ्या वरचा राग आजहि डोळ्यासमोर येतो..)


त्यादिवशी सर्वात जास्त मार कोणी खाल्ला हे आता सांगयला नकोच.


--------------------------------------------------------


स्थळ:- स्वामी मुक्तानंद हायस्कुल   इयत्ता:- ३ री किंवा ४ थी


त्या वेळेस वर्गात नविन टुम आलि होति . मधल्या सुट्टित शेजारच्या वर्गातल्या मुलांबरोबर  रामायण / महाभारत खेळायचे. आमचि फुटपट्टि हिच तलवार; गधा; धनुष्यबाण सर्व काहि...


आता लढाई करणार म्हणजे तलवार; गधा; धनुष्यबाण हे तुटणारच


पण आपली तलवार तुटलि हे मातोश्रिंना (आईला) कसे सांगणार.


मग रोज माझी पट्टी हरवु लागली(अगदि रोज न्हवे पण आठवड्यात २ वेळा नक्कीच). आई वैतागलि ... रोज कशी पट्टी हरवते???


 मग आमच्या मातोश्रिंनी रणांगणाला ( शाळेला) भेट दिलि.


तेंव्हा बाईंनी वस्तुस्थिती सांगितलि...  मुले ऐकत नाहित... आणि लहान असल्याणे मारु पण शकत नाही कारण नंतर पालक भांडतात मुलांना मारले म्हणुन


मग मला आईकडुन प्रसाद मिळाला


पण ...............


आता रामायण / महाभारत खेळायचे कसे ??? गहन प्रश्न ???


आमच्या शाळेत हरवलेल्या/ सापडलेल्या वस्तु ठेवायला एक कपाट होते... माझ्या सुदैवाने त्या कपाटाला कुलुप न्हवते...


मग काय तेच तर आमचे शस्त्रागार होते.... तिथल्या तलवारी संपे पर्यंत रोज आमचे शत्रु मरत होते...


---------------------------------------------


स्थळ:- एलफीन्स्टन टेक्निकल हायस्कुल   इयत्ता:- ८वी


नविन शाळा नविन मित्र ...


मी शाळेत नेवल एन. सी. सी. मधे नोंदणी केली होती.


सोमवार /बुधवार सकाळी ८ वाजता शाळेच्या पटांगणात जमा व्हायला लागायचे. कवायत होणार म्हणुण काहि खावुन येवु नका असा पाटील सरांचा धाक होता.


बरेच वेळा मुलांना चक्कर यायची... मग सर बोलायचे अरे जर तरी खावुन यायचे(???)


एकदा माझ्या एका मित्राला चक्कर आली ... ते बघुन मि त्याला हसु लागलो.. मनात आले काय हि पाणचट पोर.. जरा कवायत नाहि केलि तर चक्कर येवुन पडतात .


थोड्यावेळाने जेव्हा जाग आलि तेंव्हा मी वर्गात माझ्या मित्राच्या बाजुला होतो  आणि दोन मित्र माझे  पाय तर दोन माझे हात घासत होते आणि तोच माझा मित्र (चक्कर आलेला आता शुध्दिवर आला होता) माझ्यासाठी हातात पाण्याचा ग्लास घेवुन बसला होता


--------------------------------------------------


उरलेल्या गमती पुन्हा केंव्हातरि .....


अर्थात या आवडल्या तर


भालचंद्र (बंधु)