फसवून कुठे परमात्मा गेला होता?
मी फसलो कारण करार केला होता
संचितात केवळ पाप साठले होते
(फुटका माझ्या पुण्याचा पेला होता)
वार्धक्यढगांची नभात गर्दी झाली
मोक्षातुर वारा तहानलेला होता
"आहेस कुठे?" मी विचारले देहाला
कळले भलते - तो कधीच मेला होता!
मेलो नव्हतो मी कशास खोटे बोलू?
भ्रम देहाचा ह्या शोकसभेला होता
माझ्यात अंश त्याचा दरवळतो आहे
(नव्हता मजला पण गंध हवेला होता)
- माफी
नीलहंस ह्यांच्या फसवून कुठेसा वसंत गेला होता वर आधारित