रामसे बंधूंचा भयपट (?)

काल एक रामसे बंधूंचा भयपट पाहण्यात आला.. खरं तर त्यात भय वाटण्यासारखं काहीच नव्हतं. उलट, तो चित्रपट बघून हसायलाच येत होतं. एकूणच रामसे बंधूचे सगळेच चित्रपट एक सारखे असतात.  साधारणपणे पुढील गोष्टी एखाद्या भयपटात आढळल्यास डोळे झाकून तो रामसे बंधूंचा चित्रपट आहे हे ओळखावे.

१.  बहुतेक करून, या सिनेमाचा हिरो, हा हेमंत बिरजे (टारझन फेम) हाच असतो. तो सिनेमात कधीच कुठेच हसत नाही.
२.  चित्रपटात नेहमी कुत्री "भू...sss ऊ sss ऊ..sss" करून रडत असतात.. मात्र सिनेमात कुत्रं कधीच दिसत नाही.  अधून मधून एक हिरव्या डोळ्याची काळी मांजर मात्र दिसते.
३. चित्रपटात नेहमी एक 'हार्ट शेप', बाथ टब असतोच
४. भुताची एंट्री ही नेहमीच सस्पेन्स असते. म्हणजे, पहिल्यांदा जेंव्हा भूत येते तेंव्हा ते आपल्याला कधीच दिसत नाही.. नुसता कॅमेरा पुढे-पुढे जात असतो.
५. त्या नंतर दिसणारे भूत हे बहुदा अस्वलासारखे असते
६. एखाद्याला मारायला येणारे भूत हे अतिशय संथ पणे हळू-हळू चालत येत असते. मात्र भुतापासून "आ sss.. ऊ sss  बचाओ".. असे करत पळणारी नटी.. संपूर्ण वाड्याला फेऱ्या मारून येते आणि ते भूत तिथेच उभे असते, म्हणजे तिच्या समोर असते.. मग ति नटी एवढी बोंबलत फिरून परत तिथेच येते.. का ते भूत मधूनच एक्टिव्ह होते कुणास ठाऊक.
७. झि हॉरर शो ज्यांनी पाहिलाय त्यातील संगीत या चित्रपटात नेहमी येते.


असे अनेक मुद्दे मांडता येतील.. तुम्हाला माहीत आहेत अजून काही?
अनिकेत