प्रतिसाद देण्यातला आनंद

लहानग्या राजूच्या शाळेत आज शालेय नाटकात भाग घेण्यासाठी निवड करण्यात येणार होती. राजू आणि त्याच्या वर्गमित्रांनीही नाटकात काम करायला मिळावे म्हणून हिरीरीने त्यात भाग घेतला होता. त्याची आई - सरला, तिला माहिती होतं की राजूची किती जबरदस्त इच्छा आणि अपेक्षाही आहे की त्याला निवडलं जावं नाटकासाठी, जसं भाग घेतलेल्या इतर सर्वांनादेखील वाटत असणार. कदाचित त्यामुळेच की काय तिला थोडीशी भीतीही वाटत होती की त्याची निवड झाली नाही तर त्याची मनःस्थिती काय होईल ते..

संध्याकाळी सरला राजूला घ्यायला शाळेत पोहोचली. राजू अगदी धावतच तिच्याकडे आला. त्याचे डोळे अलोट अभिमान, उत्साह, आनंद यांच्या संमिश्र भावनेने लकाकत होते.
"आई, सांग काय झालं असेल?", तो उत्साहाने उद्गारला,"मला माझ्या नाटकात सहभागी दोस्तांना टाळ्या वाजवून, उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी निवडलं गेलं आहे !"

मूळ कथाकार - Unknown.
स्वैर अनुवाद - वेदश्री.