नमस्कार,
आज ठाण्यात ऑफ़िसला जातांना रस्त्यात एक फ़लक बघीतला, मजकूर असा होता की, दिनांक २७ ऑगस्टला गजाननाचे आगमन होत आहे तरिही सर्व सभासदांनी आणि रहिवाश्यांनी वर्गणी जमा करावी.
तसे या फ़लका वरचा मजकुर काहि नवा नव्हे, पण जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे कि फ़लका वरील मजकुर काहि दादागिरी स्वरूपात लिहीला गेला आहे. आपण दरवर्षि गणेशोस्तव साजरा करतो पण हि वर्गणी स्वेछेने देणे आणि वर्गणी जबरदस्तिने घेणे हे कितपत योग्य आहे.
१०० मंडळे आणि १०० कार्यकर्ते यांत हाही प्रष्न पडतो कि वर्गणी द्यावी कोणाला?
आपाले विचार आपेक्षित आहेत.