संख्याशास्त्र


आदरणीय प्रा. महालनबीस, प्रा.पी.व्ही. सुखात्मे, प्रा.व्ही. एस्. हुजूरबाजार ह्या थोर संख्याशास्त्रज्ञांची, तसेच इतरही अनेक ज्ञात/अज्ञात संख्याशास्त्रज्ञांची क्षमा मागून--


अमुचे संख्याशास्त्र । आहे गमतीचे ।
करी रंजन जनांचे । निष्कर्षांनी ॥


एक संख्याशास्त्री । शीतकपाटात शीर ।
त्याचे पाय भट्टीवर । म्हणे सरासरी सुखी ॥


धावांची सरासरी । दुसरा एक काढी ।
होई अकरावा गडी । सर्वश्रेष्ठ ॥


अपघात होती । रस्त्याच्या कडेला ।
मधुनीच चाला । म्हणताती ॥


मजेचे निष्कर्ष । त्यांनी काढलेले ।
परि न काढलेले । महत्त्वाचे! ॥


कुणीसे म्हणाले । असे संख्याशास्त्र । 
पोहण्याचे वस्त्र । भासतसे ॥


संख्याशास्त्रकथा । युद्धकथांहुनी रम्य ।
परि अपुले तारतम्य । सोडू नये ॥


-------------------------------