शिवधर्म प्रतिज्ञा

१२ जानेवारी २००५ रोजी शिवधर्म प्रकटन उत्सवात तीन  लाख बहुजनांनी शिवधर्मात प्रवेश करतांना घेतलेली प्रतिज्ञा!


मी  (स्वतःचे नाव)(आईचे नाव)(वडिलांचे नाव)(आडनाव)
आज जिजाऊंच्या प्रेरणेने शिवधर्माच्या दिशेने वाटचाल करण्याची शपथ घेत आहे.येत्या तीन वर्षाट परिपुर्ण शिवधर्मी होण्याकरिता आवश्यक असलेली कठोर साधना करण्यासाठी मी आज कटिबद्ध होत आहे.
मी शिवधर्माच्या आचारसंहितेचे तंतोतंत पालन करीन. शिवधर्माची भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी मी अयुष्यभर कार्यरत राहीन,अशी मी प्रतिज्ञा करतो/करते.


जय जिजाऊ!


आगामी शिवधर्म दीक्षाविधी सोहळा जिजाऊ सृष्टी,सिंदखेड राजा जि.बुलडाणा येथे १२ जानेवारी २००८, माँ जिजाऊंच्या जन्मदिनी होणार आहे.