सत्यनारायण

कामात यश हवे असेल तर लोक पूजापाठ करतात. सत्यनारायण, सत्यविनयक त्यापैकीच काही. कालच मी पूजा केली. पूजेकडे जसजसे लक्ष केंद्रित करु लागलो तसतसे काही मजेशीर विचार मनात डोकावू लागले.पूजा करून यश कसे मिळते? संस्कृति आपल्याला काय सांगते?
या पूजेत प्रथम कलश/वर ताम्दुळ-सुपाऱ्यानी भरलेले तबक असते. विष्णूची हजार नावे घेत आपण तुलसीपत्रे वाहतो. पूजा ब्राह्मण सांगतो. शेवटी कथा सांगतो. यावरून मी काढलेले तात्पर्य असे:


आपण कधी मोठ्या अदचणीत सापडलो, जसे दारू पिऊन गाडी लोकांच्या अंगावरून नेणे,तर ही पूजा करावी. सर्वात प्रथम जो कोणी जवळपासचा गटनेता (गणपति) असेल त्याला पुजावे. मग आपली "केस" ज्याप्रमाणे असेल तसे (आपल्या उदहरणात पोलिस) त्यांचा सर्वोच्च(कमिशनर) त्याला सुर्य मानावा.बाकी सुपऱ्या लावून योग्यतेप्रमाणे पुजुन घ्याव्यात. नंतर आपली केस ज्या पोलिस अधिकाऱ्याकडे असेल त्याच्या नावाने पुजा (सत्य अंमलदार पूजा) सुरु करवी. त्याच्या नावाचा मंत्र जागर करत हजार तुलसिपत्रे (हिरवे कागद)वहात सहावे. पुजा पुर्ण झाल्यावर ही पुजा ज्या कोणी आधी केली असेल (सलमान) त्याची कथा ऐकावी. म्हणजे पुजेचे फलित नक्किच मिळेल.(बहुधा). सर्वात महत्त्वाचे, ही पुजा ब्राह्मणाकडून म्हणजे त्या त्या क्षेत्रातील तज्ञ  व्यक्ति अथवा अडत्याकडून करून घ्यावी.


ही साठा उत्तराची कहाणी सफळ संपुर्ण...