नवसाहित्याचा कालखंड

नमस्कार,
परवाच 'नक्षत्रांचे देणे- कवी मंगेश पाडगावकर' ही तबकडी पाहत होतो.
त्यामध्ये, श्री. शंकर वैद्य म्हणतात की, '५०-५५ चा कालखंड हा नवसाहित्याचा कालखंड म्हणून ओळखला जातो. पिपात मेले ओल्या उंदीर, सहनौ टरकतो सर्वे जंतू निराशयः अशा तऱ्हेच्या कविता या कालखंडात झाल्या.... '


या 'नवसाहित्याचा कालखंडा' मध्ये कशा प्रकारचे लेखन झाले?
याचा साहित्यजगतावर कसा परिणाम झाला?
यातून काही नवीन शैली तयार झाल्या का, नव्या प्रथा पडल्या का?
ही माहिती कोणी देऊ शकेल तर फार चांगले होईल. 

आपणा पैकी कोणी पिपात मेले, सहनौ टरकतो या कविता येथे टंकीत करू शकेल का?
या कवितांत विशेष असे काय आहे? हे कोणी विषद कराल काय?

आपण मनोगतींनी ही माहिती द्यावी आणि त्यावर आपली मते मांडावे अशी सर्वांना नम्र विनंती.


आपलाच,
--(उत्सुक) लिखाळ.