माध्यमिक मराठी!

संदर्भ १) : आजच्या मटाची मुंबई टाईमस् ही पुरवणी.
पृष्ठ क्र १. 'गुणवान गरीब खेळाडूंसाठी कॉलेजेस उतरली मैदानात' ही बातमी.

या बातमीत खालील इंग्रजी शब्द/वाक्यं आढळली-

१) मूळ शीर्षकच 'गुणवान गरीब खेळाडूंसाठी कॉलेजेस उतरली मैदानात' असं आहे!
२) रिक्षा ड्रायव्हर
३) करिअर
४) कॉर्पोरेट जगत
५) स्पॉन्सरशीप
६) सोर्टस् विभाग
७) युनिव्हरसिटी
८) प्लॅन आखणे
९) नोकरीच्या ऑफर्स
१०) अटेंडन्स
११) वर्ल्ड कप
१२) स्पोर्टस् इव्हेन्ट
१३) क्रिकेटफॅन्स

संदर्भ २) : आजच्या मटाची मुंबई टाईमस् ही पुरवणी.
पृष्ठ क्र ६. 'दिवस परीक्षांचे.. लायब्ररीतले!' हा लेख.

या लेखात खालील इंग्रजी शब्द/वाक्य आढळली-

१) लेखाचं शीर्षकच मुळी, 'दिवस परीक्षांचे.. लायब्ररीतले!' असं आहे.
२) डिस्टिंक्शन
३) पास व्हायलाच हवं
४) टार्गेट
५) कॅटेगरी
६) जॉईन करतात.
७) कॉलेज ग्रुप
८) बोर्डावर टाईमटेबल लागलं की
९) नोटस् ची जमवाजमव
१०) लायब्ररीची फी
११) कॉमेन्टस्
१२) एरियातली लायब्ररी
१३) चेंज
१४) स्मोकिंग
१५) लाँग ड्राईव्ह
१६) बाईक
१७) सिन्सिअरली
१८) सायलेन्ट
१९) एन्जॉय

संदर्भ ३) : या आठवड्याचा साप्ताहिक सकाळचा अंक.
वंदना सुधीर कुलकर्णी यांचा 'आय टी - ग्लॅमर आणि आव्हान' हा लेख.

या लेखात खालील इंग्रजी शब्द/वाक्य आढळली-

१) पॉश
२) डेडलाईन्स
३) पोस्टींग्स्
४) स्पेशालिस्टस्
५) शेअरिंग
६) ऑनलाईन
७) इंटरनेट
८) स्टाफ/कलिग्स बरोबर पिकनिक्स
९) मॅनेजमेन्ट
१०) मास मेन्टॅलिटी
११) आय टी कल्चर
१२) ग्रेट
१३) डिव्हॅल्युएशन
१४) केसेस
१५) पोझिशन
१६) ट्रेनर, एच आर कंसल्टंट
१७) वर्कफोर्स
१८) इंडिव्हीजुअल व्हॅल्यूस, इंटर पर्सनल रिलेशन्सशिप
१९) इंडिव्हीजुअल, प्रोफेशनल आणि इकॉनॉमिक एक्सेलन्स
२०) डेव्हलपमेन्ट
२१) रिलेशनशिप, इनरिचमेन्ट
२२) हेल्थप्रमोशन
२३) स्पेसिफिक प्रोटेक्शन
२४) दोन किंवा तीन बीएचकेचा फ्लॅट
२५) ग्लॅमरस
.........................................

यादी न संपणारी आहे!

या लेखाचा हेतू-

मनोगतींनी वरील शब्दांना मराठी शब्द सुचवावेत, हा निश्चितच नाही!

मराठीभाषेची कळकळ असणाऱ्या आणि त्याकरता वेळ असणाऱ्या सर्व इच्छुक मनोगतींनी कृपया,

१) संपादक, महाराष्ट्र टाईमस्
टाईमस् ऑफ इंडिया चे कार्यालय,
छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकासमोर,
मुंबई.

आणि,

२) संपादक, साप्ताहिक सकाळ,
५९५ बुधवार पेठ,
पुणे - ४११००२

येथे संपर्क साधून त्या त्या संपादकांना भेटावे व जाब विचारावा किंवा निषेधाची खरमरीत पत्रे लिहावीत. दररोजच्या मटाच्या पुरवणीत असे अनेक शब्द सापडतील. तरी किमान एक महिनाभर रोजच्या रोज अश्या शब्दांचे संकलन करून रोज एक खरमरीत निषेधात्मक पत्र मटाच्या संपादकांना पाठवावे. साप्ताहिक सकाळ किंवा लोकप्रभाच्या बाबतीत असेच दर आठवड्याला करावे लागेल. निदान मराठी वृत्तपत्रात किंवा साप्ताहिकात तरी मराठी भाषेचाच वापर व्हावा, या दृष्टीने हा एक प्रयत्न असेल असे वाटते!

मला व्यक्तिश: या कामाकरता बिलकुल सवड नाही याचे वाईट वाटते.

असो.

माधवी गाडगीळ.