लखलखता सौदामिनी

flash copy1

काल रात्री मुंबईला पावसाने गाठले! रात्री साधारण साडेनऊच्या सुमारास विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट सुरू झाला व मुसळधार पावसाने वातावरणच बदलून टाकले. आकाशात असा लखलखाट होत असताना ते चौकटीत बंदिस्त करण्याचा मोह आवरणे शक्यच नव्हते. बऱ्याच परिश्रमानंतर विद्युल्लता प्रसन्न झाली आणि आमच्या चौकटीत आली.

संदर्भासहित स्पष्टीकरण- लोकसत्ता- ग्राफिटि वॉल

रोजचा पेपर माझ्याप्रमाणे इथे अनेक जण वाचत असतील. त्यातील  काही आवडणाऱ्या, टोचणाऱ्या ,हसवणाऱ्या गोष्टींवर चर्चा अथवा विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी मनोगताचा मला उपयोग होतो एवढे नक्की. दोन तीन प्रतिसाद असतात पण लिहिण्याचे सार्थक झाले असे वाटणारे!

पाय मातीचे! -३

विश्वासराव हादरुन गेले होते. आनंदराव - ठीक आहे, आपण त्यांचं काहीसं रेप्युटेशन ऐकून आहोत, पण गुलाबराव? आणि सोपानआबासुद्धा?.... नगर जिल्ह्यातल्या खेडेगावातलं सोपानआबांचं साधं घर विश्वासरावांना आठवलं. अद्यापि शेतावर काम करणारी त्यांची बायको, ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकणारी त्यांची मुलं... सगळं ढोंग, सगळं नाटक! शेवटी प्रत्येकाचे पाय मातीचेच! मातीचेच पाय!
राजकारणी लोकांना न शोभणारी एक विलक्षण विषण्णता विश्वासरावांच्या मनावर दाटून आली. कसं बदलणार हे सगळं आपण? कशाकशाविरुद्ध आणि कुणाकुणाविरुद्ध लढणार?  कुठपर्यंत आणि कुणाच्या भरवशावर?  त्यांच्या सभांसाठी शंभरशंभर मैल उन्हातानातून आलेले गरीब, केविलवाणे लोक त्यांना आठवले. त्यांचे वाळके चेहरे, चोपलेली शरीरं, फाटके, मळके कपडे....या राज्यातली शेकडो एकर कोरडी, भेगाळलेली जमीन...वाळवीच्या वारुळासारखी बजबजलेली महानगरं..‍.जहर ओकणाऱ्या इंडस्ट्रीज... आणि हे चित्र बदलण्याचं आपण स्वतःलाच दिलेलं वचन...आणि हे आपले अगदी सख्खे सहकारी...पाण्यातलं प्रतिबिंब बघून आपण माणसांची पारख करतो असा लौकिक आहे आपला, आणि आपल्या हातून अशी चूक व्हावी? इतकी?
"रिलॅक्स, विश्वासराव." भानुप्रताप राव त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. "ही फक्त संशयितांची लिस्ट आहे. बातमी अजून कन्फर्म्ड नाही. स्विस बँकांची गुप्तता तर तुम्हाला माहितीच आहे. खातेदारांची माहिती तर इतर कुणालाच मिळत नाही. या बँकांवर फेडरल बँकिंग कमिशनचं नियंत्रण आहे, तिथंही आपण प्रेशर टाकतो आहोत.  डिप्लोमॅटिक लेव्हलवर आपले प्रयत्न सुरुच आहेत, पण मला नाही वाटत या सगळ्याचा काही उपयोग होईल.आपल्याला एखाद्या प्रॉसिक्यूटरची  किंवा जजची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी या खातेदारांची काहीतरी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे असं सिद्ध करावं लागेल ... एकंदरीत कठीण मामला आहे."
"मग, सर.... आपण काय करणार आहोत?"
"आय वाँट यू टू पर्सनली हँडल धिस विश्वासराव. तुम्ही स्वतः लक्ष घाला यात. एकतर ही बातमी खरी आहे का हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे. या लोकांनी कुठलीकुठली डील्स हँडल केली आहेत ते बघीतलं पाहिजे. जर ही नावं खरी असतील तर हा उघडउघड काळा पैसा आहे, भ्रष्टाचारातून जमवलेला. ही कीड आपल्याला संपवलीच पाहिजे. त्यासाठी कितीही, कुठलीही किंमत द्यायला लागली तरीही."
"यस सर."
"तुम्ही स्वतः जिनिव्हाची एक व्हिजिट प्लॅन करा. झुरिकपेक्षा तिथंच या लोकांचा पैसा जास्त आहे, अशी खबर आहे. तुमची व्हिजिट ऑफिशिअल नको. खाजगी कारणासाठी म्हणून जा. मेडीकल रीझन वुड बी अ गुड कव्हर अप. फॅमिलीतले एकदोन लोक बरोबर न्या. दॅट विल लुक मोर कन्विन्सिंग.  आणि डायरेक्ट स्वित्झर्लंडलाही नका जाऊ. यू.एस. मार्गे जा हवं तर, पण कुणाला संशय यायला नको. तिथल्या चार बँकांची यादी तुम्हाला जाण्यापूर्वी मिळेल. चारही खाजगी आहेत. त्यांच्या चेअरमनना भेटा.  आय ट्रस्ट युवर निगोशिएशन स्किल्स. पण आपल्याला पक्की माहिती पाहिजे. तुम्हाला मदत म्हणून आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज कोऑर्डिनेट करण्यासाठी आपण एक स्पेशल सेल तयार करतो आहोत. 'नॅशनल ऍंटी करप्शन सेल.' एकच सदस्य असेल या सेलचा. अगदी माझ्या विश्वासातला खास माणूस - वीरेन तलवार. ही विल रिपोर्ट डायरेक्टली टू यू. आपल्या तीघांशिवाय यात कुणीही इन्व्हॉल्व्ह्ड असणार नाही."
"मला वाटतं सर, आपण आमच्या गृहमंत्र्यांना तरी याची कल्पना द्यावी. अशोक चलाख माणूस आहे सर. तो नजर ठेवेल इथं..."
भानुप्रताप राव हसले. देशाच्या पंतप्रधानांचं, आणि राजकारणातले पन्नास पावसाळे पाहिलेल्या माणसाचं हास्य. या माणसाला कुठलीही गोष्ट धक्का देऊ शकणार नाही, असं एखाद्याला वाटेल असं हास्य.
"तुम्ही लिस्ट पूर्ण वाचली नाही, विश्वासराव. दुसऱ्या पानावर तुमच्या अशोक गावडेंचंही नाव आहे...."
हे ऐकण्याची विश्वासरावांच्या मनाची तयारी झाल्यासारखीच होती. जवळजवळ अपेक्षितच होतं हे.  व्हेन स्मॉल पीपल बिगिन टू कास्ट लाँग शॅडोज, इट इस टाईम फॉर द सन टू सेट. मातीचे पाय! मातीचे पाय असलेली माणसं!
कसला तरी निर्णय झाल्यासारखे विश्वासराव उठले.  
"ट्रस्ट मी सर. मी हे सगळं खणून काढीन. या बेईमानांना आपण नंगे करू. जनतेचा पैसा गिळणाऱ्या या सापांना आपण ठेचून काढू."
"मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती, विश्वासराव. परवा वीरेन तुम्हाला भेटेल. घरी, ऑफिसमध्ये नाही. दोन आठवड्यांनंतर तुमची व्हिजिट प्लॅन करा.आणि तुम्ही फक्त मला रिपोर्ट कराल. कीप धिस इन माईंड".
"यस सर."
"गुड लक, विश्वासराव...."
"थँक यू, सर" विश्वासराव उठले
"आणि विश्वासराव..."
"यस सर?"
"मी जरा जास्तच करतोय असं वाटेल तुम्हाला कदाचित, पण सांभाळून. इथं धोका आहे. हे भ्रष्ट लोक कुठल्या पातळीवर जातील सांगता येत नाही. तेंव्हा काळजीपूर्वक रहा. कुणावरही पूर्ण भरवसा ठेवू नका. अगदी तुमच्या बॉडीगार्डसवर पण. स्वतःजवळ.... स्वतःजवळ.." हे शब्द बोलतांना भानुप्रताप रावांना जड जात होतं हे विश्वासरावांना जाणवलं.
"स्वतःजवळ काय, सर?"
"स्वतःजवळ एखादं वेपन ठेवा. जस्ट इन केस."
विश्वासरावांनी हातातलं पाऊच उघडलं. आत एक छोटसं चकचकीत रिव्हॉल्वर होतं.
"लोडेड आहे सर. स्मिथ ऍंड वेसन"
"गुड."
(क्रमश:)

पाय मातीचे! -२

विश्वासरावांचा कामाचा झपाटा तर त्यांच्या कट्टर विरोधकांनाही थक्क करुन टाकणारा होता. आणि कामं तशी बरीच करायची होती. एका जर्मन कंपनीचा पॉवर प्रोजेक्ट लाल फितीत अडकला होता. पाटबंधारे खात्याचेही बरेच फंडस मार्गी लावायचे होते. महामार्गाचं सहा पदरीकरण सुरु होऊन रखडलं होतं, तेही बघायचं होतं. वर्ल्ड बँकेच्या मदतीसाठीचं एक प्रपोजलही नजरेखालून घालायचं होतं.

युरोपायन - भाग१

नमस्कार मित्रहो,

अगदी लहानपणापासून मला दैनिके किंवा मासिकामधून छापून येणाऱ्या देशाटनाच्या आणि सफरीच्या गोष्टी वाचण्याची नितांत आवड होती. विशेषतः अमेरिका, युरोप..भरतामधील अनेक स्थळे हे म्हणजे माझे अत्यंत आवडीचे विषय. कधीकधी वाटायचे की मी ही असेच कुठेतरी जाऊन यावे आणि एखादा स्वानुभव सगळ्यासमोर विशद करावा.

तेरेखोल ते विजयदुर्ग : सफर सिंधुदुर्ग किनार्‍याची

कोकणातील तीन दिवस केलेला हा ट्रेक चुकू नये अशी मनोमन इच्छा होती, आणि त्या दृष्टीने सर्व 'तयारी' करुन या भ्रमंतीमध्ये मी सामील झालो. प्रवासाला सुरुवात केल्यानंतर कोल्हापुरात एक थांबा घेउन पुढे जायचे असे ठरले होते, पण निघतांनाच उशीर झालेला असल्यामुळे कोल्हापुरातील थांबा रद्द करावा लागला. गगनबावडा हा बहुचर्चीत घाट उतरुन कोकणात शिरत असतांनाच कोकणच्या वैशिष्ट्यपुर्ण कोकण रेल्वेने आमचे जोरदार स्वागत केले. पुढे सागरेश्वराला पोहचल्यानंतर बराच उशीर झालेला होता तरिही समुद्राचा तो आवाज सर्वांनाच तिकडे खेचुन घेउन गेला.

समाज

समाज (ज चा उच्चार 'जर्दा' तल्या ज सारखा) म्हणजे सर्वांनी केलेला माज (ज चा उच्चार 'जहाजा' तल्या ज सारखा). महाराज साभिनय तावा तावा ने बोलत होते .... अफाट जन सागर प्राणांचे कान करून ऐकत होता. माणसांचा कळप म्हणजे समाज.... माणसातून माणुसकी वजा केली की उरतो तो वन्य प्राणी..... ही माणुसकी वजा करावयाचे काम करतोय अहंकार आणि स्वार्थ.... संपत्ती, ऐश्वर्य म्हणजेच पैसा हा ह्या अहंकार आणि स्वार्थाच्या अग्नीचा कारक आणि क्षपणक आहे. 

निवद-एक ग्रामीण कथा

    रंगानं बोंब मारली तसा गाव जागा झाला. हा हा म्हणता बातमी गावभर पसरली. श्यामा म्हातारा गेला. सोना म्हातारी म्हणाली,
    "चांगला होता बिचारा, काल माझ्यासंगं घटकाभर बोलला अन् असं अचानक काय झालं गा?"
    "झोपेतच कवा मरुन पडलाय म्हणत्यात."
    "पोराचं कसं व्हायचं गं तारा?"
    "त्यास्नी काय हुतया? चांगली दोन हजार पेन्शन मिळलं म्हातारीला."
    "व्हय बाई, पैसा काय थोडा साठविलाय तेनं. बिचार्‍यानं चैन कवा केलीया? धडूतं सुद्धा कवा चांगलं घातलं नाही."
    पारी म्हातारी म्हणाली, "एकादशीचं मराण आलं, स्वर्गाची दारं उघडी असत्यात, नशीबवान हाय."
    मनात मी म्हटलं,
    "दार उघड असत्यात ते बघाय गेलतीस की काय? काय देवानं तुलाच नेमलीया ह्यो स्वर्गात ह्यो नरकात हे बघायला?"
    तुळसा आपल्या धन्याजवळ गेली. "अवं ऊठा की. श्यामू मामा गेलंत."
    तसा शिरपानाना म्हणाला,
    "थंडी मरणाची पडलीया, त्यातच हे सकाळी सकाळी मेलं." अंगावरचं कांबरुन त्यानं बाजूला केलं. तसं त्याला जास्तच थंड वाजाय लागली. मनातल्या मनात शाम्या म्हातार्‍याला शिव्या देतच तो बाहेर पडला.
    एवढ्यात श्यामाची पोरगी तिकडून बाबा गाss ये माझ्या बाबा, येsयेss रडत आली. मी मनात म्हटलं,
    'तो खरचं आला  तर ठो ठो बोंबलत पळशील गप रड.' रडारड जोरात वाढली होती.
    शिरपानाना म्हणाला, "भावकी कुठं गेली, शेणकुटं, लाकडं, टायरं आणा जावा की. काय मढं इथंच ठेवता?"
    एवढ्यात हिंदूराव म्हणाला,
    "जन्मात कधी चांगलं धडूतं घातलं नाही, सदान् कदा फाटलेलं आन् मळकटलेलं. आज मेल्यावरच त्याला नवं कापड मिळालं."
    सगळी तयारी झाली पण अजून एका पाव्हणीची लोक वाट पाहत होती, पण तिचा पत्ता नव्हता.
    श्यामाच्या भावकीत परवा दिवशी एक लग्न होतं. ज्या पठ्ठ्याचं लग्न होतं त्याचं वय चाळीस झालतं. अनेक कारणांनी त्याचं लग्न मोडलंतं. त्याचं लग्न ठरल्यानं ते हारकलतं. ते सद्याला म्हणालं, "शामू तात्यानं चार दिस कड काढायचा नाही, आता लगीन पुढं ढकलाय पाहिजे, काय तरी विघ्न आलं तर?"
    पाव्हणी आली. प्रेत स्मशानात आणलं. पोरग्यानं प्रेताला अग्नी दिला. शिरपानाना म्हटला,
    "मार बोंब."
    तशी त्यानं शेवटची बोंब मारली. लोकांनी हाराटीची पात गोळा केली. शिरपानाना म्हटला,
    "झाडा झाडा संसार सोडा, पाप पुन्याचा केला निवाडा. शामराव कडवे बसव्याची शेपूट धरून कैलासाला गेला." मघाशी स्वर्गात गेला, आता कैलासात गेला. आता श्याम्यालाच माहीत तो नेमका कुठ गेला? लोकांनी हाराळीची पाती अग्नीत टाकून परतीचा मार्ग धरला.
    तिसर्‍या दिवशी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम. हळूहळू गाव जमलं पै-पाव्हणं जमलं. प्रत्येक पाव्हण्याच्या हातात निवदाच्या पिशव्या होत्याच. सकाळी दहा वाजता लो़क राखंच्या ठिकाणी आली. राख एकत्र केली. पिंड केला. त्याला पाणी पाजलं. पाणी पाजून झाल्यावर शिरपानाना म्हंटलाच,
    "ज्यानं ज्यानं निवद आणल्यात त्यांनी ठेवावं." तसं पै-पाव्हणं पुढं सरकलं. एका परीस एक पदार्थ निवदावर होतं. शामरावाच्या बापजाद्यांनी सुद्धा असलं पदार्थ खाल्लं नसतील. एका पाव्हण्यानं तर कमालच केलती. त्यानं बाटलीतून दारू ठेवलीती. हे बघून एक म्हातारा पाव्हणा म्हणाला, "पिता व्हय गा ह्यो, आम्हाला कधी कळलंच नाही, नाहीतर..."
    "ते कुठलं प्यालं असंल चाऊन चिकाट होतंनी. चोरुन पितं काय कुणास ठाऊक." अशा गप्पा चालल्या होत्या. उन्हामूळं लोकांची थंड जरा कमी व्हाय लागलीती पण कार्यक्रमाचा मुख्य पाव्हणा एक बी हजर नव्हता. प्रत्येकाच्या नजरा त्याला आंब्याच्या झाडावर शोधत होत्या. त्याचा काय बी पत्ता नव्हता. घटकाभर असाच गेला. ऊन लोकांना आता सोसवंना. ती सावली शोधाय निघाली. एवढ्यात गावचं पाटील म्हणाले,
    "शामूदानं कुणाला हाक मारली तर लोक थांबत नव्हती, त्याचं काय मत हाय जाणून घेत नव्हती. म्हणूनच डाव काढलाय त्येनं." असा नवा शोध त्यांनी लावला. ताटकाळलेली माणसं खाली बसली. तानबा हळूच आपल्या दोस्ताला म्हणाला, "माझी आज शेताला पाणी पाजायची पाळी होती, आज जर पाणी नाही घेतलं तर पुढल्या आठवड्यातच मिळणार, मी काय गा म्हणून इकडं आलो अन् अडकून बसलो?" तशीच गत नोकर वर्गाची झालती. लोकांची चुळबूळ सुरु झाली. अचानक एक कावळा आंब्याच्या झाडावर आला. एखादा कार्यक्रमाचा मंत्री आल्यावर जेवढा आनंद होतो त्याच्याही पेक्षा जास्त आनंद लोकांना झाला. शिरपानाना म्हणाला,
    "मागं व्हा, कावळा बुझंल."
    लोक सारसार मागं सरकली. पण कावळा काय हालंना. घटकाभर असाच गेला. कोणीतरी म्हणालं,
    "पोराला पाया पड म्हणावं."
    पोरगा पाया पडला. जावई पाया पडला. कदाचित जावाई असं म्हणाला असंल,
    "मामा, पोरगीला अजिबात त्रास देत नाही. निवद तेवढा शिवा. शिवला नाहीसा तर मात्र....."
    भाऊ, भाचा, पुतणे पाया पडले. पण काही उपयोग होईना. शिरपानाना म्हणाला,
    "मोटरपंप चालविता. त्येचा जीव त्यात अडकला असंल. तवा व्यवस्थित चालवताव म्हणारं पोरांनो."
    पण काही उपयोग झाला नाही. गणा म्हणाला, "त्याचा नातवावर लई जीव हुता. त्येला आणा जावा."
    तसं एक कॉलेज कुमार गाडीवरनं त्याला आणाय गेलं. ते पोरांच्या बरोबर गोट्यानं खेळंतं. त्याला गाडीवर घेतलं नि घेऊन आलं. ते त्याला असं घेऊन येत होतं की जणू हिमालयाचं शिखरच त्यानं पार केलंय. पण त्याचा बी काय उपयोग झाला नाही. गाईला आणाय पोरं निघाली, तवर दुसरा कावळा आला. सिनेमातली नटी आल्यावर जेवढा आनंद लोकांना झाला असता तितका आनंद लोकांना त्या कावळ्याला पाहून झाला. तो आला. त्यानं इकडं तिकडं मान फिरवली अन् बाटली असल्याला निवदावर चोच मारली. त्या पाव्हण्याला आनंद झाला. छाती पुढं काढून ते म्हणालं,
    "मामानं माझा निवद शिवला."
    'ह्यो अन् कुठला भाचा?' विचार कराय लोकांना वेळ नव्हता. त्यातनंबी पोलीस पाटील म्हणाले,
    "त्याची प्यायची इच्छा मागं राहिली असलं, म्हणूनच त्यानं लांबच्या भाच्याचा निवद शिवला." लोक लगबगीनं घराच्या वाटंला लागली.
    या रक्षाविसर्जनासाठी आलेला दिलीप घरात पोहोचला. आईनं विचारलं,
    "एवढा वकूत का रं?"
    "काय सांगतीस निवद शिवला नाही तात्यानं लवकर."
    "लोक अशी वैतागलीती म्हणतीस काय सांगू."
    "आंघोळीला पाणी काढलंय. आंघोळ करुन घे आगोदर."
    "आंघोळ नगं, जेवाय वाढ आगोदर. भूक लागलीया."
    "आंघोळ केल्या बिगार काय खायचं नसतंया."
    "आगोदर आंघोळ कर मग वाढतो."
    "आय, मी खाल्ली बर्फी. खिशात हुती, सकाळी घेतल्याली."
    "कुठं खाल्लीस रं?"
    "तिथच की राखं जवळ चोरुन."
    "काय तुझ्या मानंवर भूत बसलतं, काय आग पडलीती. थोडावेळ कड काढता आली नाही व्हय?"
    "काय होईल गं आय?"
    "काय हुईल तुझा मेंदूच तपासून आणाय पाहिजे. असं राखंला गेल्यावर खात्यात व्हय? परमेसरा, आमच्या मागं काय इगनं लावतुयास?"
    त्याच्या मनाला लागलं. कशीतरी आंघोळ करुन चार घास खाल्लं. शेजारच्या गणपानानाकडं गेलं. त्याला सगळा वॄत्तांत त्यानं सांगितला. ते बी हुत बेंडल. ते म्हणालं,
    "दिल्या आता बस लेका, तुझ्या अंगावर श्याम्या बसणार!"
    तसं तेचं काळीज धडकाय लागलं. काय करावं त्येला कळंना. 'आता माझं काय हुणार? त्यो माझ्या पाठी लागला तर?' करतच ते घरात गेलं. चिन-बिन कराय लागलं. श्याम्या, श्याम्या आला म्हणत वरडाय लागलं. दिलप्याला श्याम्यानं धरलं ही बातमी गावभर झाली. लो़क दिल्या कसा करतोय ते बघाय यायला लागली. देवाच्या बायकांची पर्वणीच. त्या अशावेळी न चुकता आल्या. त्यातल्या एकीनं चुलीतला अंगारा लावला नि म्हणाली, "तुझा काय असंल त्यो दानापानी टाकताव, खरं झाडाला सोड, त्याचं हाल करू नगंस."
    जटवाली बाईनं सांगितलं,
    "तीन शिरंचा लिंबू घे, उभा कापून त्याच्यावरनं उतरुन उगवत्या बाजूला टाक, तसंच दोन वाटी भात, रस्सा, मटण ते बी त्येच्यावरनं उतरून उगवत्या दिशेला वताडात ठेव. ठेवल्यावर मागं बघू नगसं." मी मनात म्हणालो, "मागं वळून कसं बघून चालंल? तू दिसणार ना खात्याली." उतारा उतरला पण दिल्याच्यात काही फरक पडला नाही, दुसर्‍या दिवशी सकाळी उठलं ते नदीकडच पळालं. नदीत उडीच मारली. पोरांनी बाहेर काढलं.
    कॉलेजची पोरं जमा झाली. एका पोरानं उसाचा बुडका हातात घेऊन त्याला माईक केला नी सुरवात केली,
    "आपण कब-तक या वाहिनीवरून सिधे प्रसारण पाहत आहात. सर्व प्रथम आम्हीच इथे पोहोचलो. हा जो समोर मनुष्य दिसतो आहे तो दिलीप आहे. त्याला म्हणे भूतानं झपाटलं आहे. अशी इथल्या भोळ्या भाबड्या ग्रामस्थांची समजूत आहे, जर तुम्हाला वाटत असेल दिलीपला खरच भूतानं झपाटलंय तर १२००५६७८०१ या क्रमांकावर डायल करा. तुम्ही एसएमएस सुद्धा करू शकता, ६६६६ होय साठी, नाही साठी ५५५५. पुन्हा आपण भेटणार आहोत थोड्याश्या विश्रांतीनंतर. दिलीप काय खातो, कसा राहतो, त्याच्या आवडी निवडी, त्याच्या आईला विचारणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका. सनसनी बातम्यासाठी पहात रहा कबतक.."
    पोरं गंमत करत होती. इतक्यात तिथं राजू पोहचला. हा राजू अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करत होता. या राजूनं देवांच्या बायकांची अनेक प्रकरणं उपटून काढली होती. त्या बायांनी याला हैराण केलं होतं. घरात लिंबू कापून टाक, अंगार्‍याच्या पुढ्या टाक, त्याच्या नावावरनं देवाला नारळ वाढव असे प्रकार केले. पण राजू डगमगला नाही. या राजूनं ओळखलं हे प्रकरण आपल्यानं सुटणार नाही. त्यासाठी आपल्या कमिटीतल्या शिरसाठ सरांना बोलवाय पाहिजे. हे शिरसाठ सर म्हणजे सुद्धा भन्नाटच होते. गरज असेल त्यावेळी अंगात सुद्धा खोटं काढायचे. लोकांना वाटायचं खरंच सरांच्या अंगात आलय. पण शेवटी लोकांना अंगात येणं, भूत बसणं हे कसं खोटं आहे हे समजवायचे. त्यांनी पहिल्यांदा दिलीपला आपलसं केलं नि मग म्हणाले,
    "दिलीपराव, भूतबित काय नसतंय, हा सगळा आपल्या मनाचा खेळ आहे, तुम्ही भिऊ नका."
    देवाच्या बाया पाय आपटतच आलेल्यांना शिव्या देत बाहेर पडल्या, त्यांचं गिर्‍हाईक जाणार होतं. दिलीपला खूप समजावलं तो ऐकेना, पण झटकन बोलून गेला, "तुम्ही तिथं चला अन् बर्फी खावा चला."
    शिरसाठ सर म्हणाले,
    "बर्फीच काय आम्ही चापाती भाजी सुद्धा खातो."
    दिलीपबरोबर पोरांचा घोळका निघाला. गल्लीतल्या म्हातार्‍या बायका दिलीपला बघून म्हणाल्या, "चार दिसांत पोराला पार पिळून काढलं, पाक बाद झालं पोरगं, कसं चांगलं हुतं."
    काही लोक हसत होती, लांबनच म्हणत होती,
    "तुम्हाला दिलीपराव म्हणायचं की शामराव?"
    स्मशान शेड आले. कमिटीनं खिशातलं हात रुमाल काढले. ते अंथरले त्यावर बसून चपाती भाजीसोबत बर्फी खाल्ली. ते पाहून दिल्याला आनंद झाला. त्या आनंदातच तो म्हणाला,
    "माझ्या अंगावरनं श्याम्या आता यांच्या अंगावर गेला." अन् त्यानं पोबारा केला.
    दुसर्‍या दिवशी तो राजूला भेटला. त्या कमिटीत सहभागी झाला. गेली दोन वर्ष राजू अन् दिलीप गावात अंधश्रद्धेविरोधात काम करतात.
    आज गावात माणसं आजारी पडूद्यात, नाहीतर जनावरं, लोक देवांच्या बायकांकडे न जाता डॉक्टरकडे जातात. रात्री अपरात्री बिनदिक्कत शेताकडं, नदीकडं जातात. कधी कधी लोक दिलीपराव आठवला कि काय शामराव म्हणतात.
    हास्याची लकेर उमटते आणि लोक कामाला जातात.

पाय मातीचे! -१

"मी, बबनराव तुकाराम अडसूळ,ईश्वराला साक्षी ठेऊन अशी शपथ घेतो की...." राज्यपालांच्या मागोमाग बबनराव मंत्रीपदाच्या शपथीचे शब्द म्हणत होते. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेल्या विश्वासरावांनी आजूबाजूला एक समाधानाची नजर टाकली. बहुतेक नेहमीचे, अपेक्षित चेहरे. नामदेवराव, सोपानआबा, गजाननतात्या, सुभानराव, जगन्नाथबापू...  काही नवीन चेहरे. काही अगदी अनपेक्षितही! आता येती पाच वर्षं यांच्याच भरवशावर गाडा हाकायचा आहे. आता पाच वर्षे हे आपले सहकारी, मित्र आणि कार्यकर्तेही! आता यातले किती बरोबर टिकतात ते बघायचं! राजकारणात कुणी कायमचा मित्र नाही की कुणी कायमचा शत्रू नाही!

शेजारच्या खुर्चीत बसलेल्या आनंदरावांनी झब्ब्याच्या खिशातून रुमाल बाहेर काढला तसा कुठलासा इंपोर्टेड परफ्यूम हवेत दरवळला. जरासा उग्र, किंचित मादक. आनंदराव! विश्वासराव गालात हसले. आजपासून राज्याचे उपमुख्यमंत्री! त्यांचे भडक कपडे, रेबॅनचे  चकचकीत गॉगल, करकरत्या वहाणा! पण सत्ता पाहिजे तर अशा कालपर्यंतच्या विरोधकांना बरोबर घेऊनच चालावं लागणार! निवडणुकीपूर्वी नांदेडच्या सभेत याच आनंदरावांनी त्यांच्यावर केलेली जहरी टीका विश्वासराव विसरले नव्हते. "हा कसला विश्वासराव? हा तर विश्वासघातराव!..."  आणि आता? विश्वासरावांचं हास्य रुंदावलं. राजकारणात हे चालायचंच! 'बेरजेचं राजकारण' मिडीयावाल्यांनी त्यांच्या बाबतीत लोकप्रिय केलेला शब्दप्रयोग त्यांना आठवला."विश्वास, लोकशाहीत डोक्यांच्या संख्येला महत्त्व असतं" दादा त्यांना सांगत असत. " डोक्याच्या आत मग काही नसलं तरी चालेल!"...तडजोड! तडजोड!  पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेडफेलोज...

अस्सल पुणेरी

केशव - साधा सरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा.
सामान - त्याची प्रेयसी.
काटा काकु - चांगली दिसणारी पण वयाने ज्यास्त.
खडकी - एकदम टुकार.
झक्कास - एकदम चांगले.
काशी होणे - गोची होणे.
लई वेळा - नक्की, खात्रीने.
चल हवा येवू दे - निघून जा.