अरसिक किती हा...

अरसिकाशी गाठ नको रे बाप्पा!

हे लोक रंगाचा बेरंग करतात. कदाचित नकळत असेल, पण करतात खरे. ’छावा’ या नाटकाचा ठाण्यातला पहिला आणि एकुणं दुसरा प्रयोग; पहिला आदल्याच दिवशी रवींद्र ला झाला होता. रांगेत उभे राहून, ओळख काढून मोक्याच्या जागेची तिकिटे मिळवली होती. नाटक सुरू झाले. मराठ्यांचा युवराज मुघल आणि स्वकीय या दोहोंचा पाठलाग चुकवीत परागंदा झालाय आणि तो आपल्या महाराणीला जंगलातील एका मंदिरात भेटतोय असा प्रसंग होता. महाराणींनी प्रवेश केला मात्र, आमच्या पुढील रांगेतून कुजबुज सुरू झाली - "अय्या! अग स्मिता तळवलकरची नारायण पेठ बघ काय सुंदर आहे ना?". "हो ना!अग नाटक नवीनच आहे ना, सगळे कपडे कोरे करकरीत असतील." "बरी मिळाली हो, मी मागे किती शोधली पण हा रंग मिळालाच नाही कुठे". " हात्तिच्या! इतका काही दुर्मिळ नाहीये काही हा रंग, आता दोन महिन्यापूर्वी माझ्या जावेने अगदी अश्शीच घेतलीन मुलाच्या मुंजीत" "तुझी जाऊ काय बाई रोज सुद्धा घेईल; दीर जकात विभागात आहेत ना!" आता इथे पुलंची आठवण होणे अपरिहार्यच होते! पु. ल. असते तर त्यांनी लिहिले असते की ’हे ऐकल्यावर मराठ्यांचा राजा आपल्या हाताने साखळदंडात स्वतः:ला जखडून औरंगजेबासमोर हजर झाला असता’.  तसं म्हटलं तर यांना अरसिक तरी कसे म्हणावे? साडी पाहताच इतका तपशील आठवला ही रसिकताच नाही का? मग अस्थायी असली तर काय झाले?

अनोखा परिचय ऋग्वेदाचा

अमेरीकेच्या वास्तव्यात एक अनोखे पुस्तक वाचनात आले. काहीसे अनोखे नाव असलेल्या या पुस्तकाचे नावच आहे   'अनोखा परीचय ऋग्वेदाचा '

पुस्तकाचे लेखक श्री. रघुनाथ दत्तात्रेय जोशी, हे व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजीनिअर. वडीलांचा व्यवसाय भिक्षुकी. वयाच्या १३ /१४ वर्षीच ऋग्वेदातील ९०० ऋचा वडीलानी बाल रघूनाथाकडून पाठ करून घेतल्या. कारण, व्यवसायाचा वारसा त्याना आपल्या मुलग्याकडे द्यावयाचा होता. पण विधीलिखित काही निराळेच होते. रघूनाथराव इलेक्ट्रिकल इंजीनियर झाले आणि नोकरी करत असताना, संस्कृत पंडीतही झाले. १० वर्षे ऋग्वेदाचा अभ्यास करून, २००४ साली वयाच्या ७९ व्या वर्षी 'अनोखा परीचय ऋग्वेदाचा ' हे नि;संषय अनोखे वाचनीय, प्रत्येकाच्या संग्रही असावे असे एक पुस्तक लिहिले. त्यांच्या पत्नी सौ. वसुधा रघूनाथ यानीच ते पुस्तक प्रकाशीत केले.

मराठी भाषेचे रडगाणे

काही मूलभूत सत्ये

  1. मराठीच ऱ्हास होत आहे ही ओरड कित्येक वर्ष सुरू आहे.
  2. जगात अनेक भाषांचा असाच ऱ्हास होत आहे व त्याबद्दल ओरडही अशीच आहे.
  3. अनेक वर्षांच्या वैचारिक हस्तमैथुनाने (Intellectual masturbation) ने हा प्रश्न सुटलेला नाही.
  4. आर्थिक लाभ असेल तिकडे पळणे ही संस्कृती निदान गेल्या पन्नास वर्षात पूर्व आणि पश्चिम देशात वाढीस लागली आहे.

काही उपाय

संजय संगवई

१९८८-८९. कोल्हापूर. साहेबांनी बोलावलं म्हणून त्यांच्या कक्षात गेलो.

समोर कृष शरीरयष्टीचा एक तिशीतील गृहस्थ बसला होता. अत्यंत बोलके डोळे. चेहऱ्यावर पसरलेली खुरटी दाढी. माझी वर्षानुवर्षांची ओळख असावी तसं त्यांच्या त्या बोलक्या डोळ्यांनी माझ्याकडं पाहून ते ओळखीचं हसले.

पाय मातीचे! -४

पुढच्या आठवड्यात विश्वासरावांना अचानक थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं. सगळ्या वैद्यकीय तपासण्या झाल्या. "काही विशेष नाही..." डॉक्टरांनी पत्रकारांना सांगितलं "थोडंसं ब्लडप्रेशर वाढलंय, पण काही खास नाही. मुख्य म्हणजे थकवा आणि ताण. विश्रांती हेच खरं औषध. मुख्यमंत्र्यांना सुट्टीची गरज आहे". मंत्रीमंडळाच्या अनौपचारिक बैठकीत विश्वासरावांनी खरं तर डॉक्टरांचं म्हणणं हसण्यावारीच नेलं असतं, पण आनंदराव काही ऐकायला तयार नव्हते. "दादा, हत्ती ओढून आणलाय तुम्ही, आता काही नाही, वहिनीसाहेबांना घ्या बरोबर आणि मस्त महिनाभर अमेरिकेला मुलाकडं जाऊन या बघा!" (केवढा बटबटीतपणा! तेवढ्यातही विश्वासरावांच्या मनात येऊन गेलं!) मग होय नाही करता करता एक पंधरा दिवस तरी राहुलकडं फ्लॉरिडाला जाऊन यायचं विश्वासरावांनी मान्य केलं. दोन दिवसांत सगळी तयारीही झाली. 'स्वखर्चानं सुट्टीवर जाणारा पहिला मुख्यमंत्री!' जाधवांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये  झकास कॉपी दिली. विश्वासराव अमेरिकेला निघाले.

या सगळ्या गडबडीत दिल्लीहून आठवड्यात दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गुपचूप त्यांच्या घरी रात्री उशीरा येऊन गेलेल्या एका उंच, गोऱ्या तरुणाकडं कुणाचं लक्षही गेलं नाही.

फ्लॉरिडात पोचल्यावर विश्वासरावांनी राहुलच्या घरी दोन दिवस अगदी मनसोक्त विश्रांती घेतली. वहिनीसाहेबही श्रुतीचे लाड करण्यात रमून गेल्या होत्या. वीकएंडला राहुलने डिस्नी वर्ल्डचा कार्यक्रम आखला होता. अचानकच विश्वासरावांनी आपल्याला काही कामानिमित्त न्यूयॉर्कला जायला लागणार असल्याचं जाहीर केलं. राहुलला थोडंसं आश्चर्य वाटलं, पण वहिनीसाहेबांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही. त्यांनी काही न बोलता विश्वासरावांची बॅग भरायला घेतली.
न्यूयॉर्कहून स्विसएअरच्या विमानानं विश्वासराव रविवारी संध्याकाळी जिनिव्हात दाखल झाले. एका सामान्य हॉटेलात त्यांनी एक खोली भाड्यानं घेतली. त्या दिवशी रात्री विश्वासरावांना अस्वस्थ, वेड्यावाकड्या स्वप्नांनी भरलेली झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टनंतर  त्यांनी भानुप्रताप रावांनी दिलेल्या यादीतल्या पहिल्या बँकेला फोन केला. चेअरमननी भेटीसाठी दुपारी बाराची वेळ दिली.
बाराला दहा मिनिटं कमी असताना विश्वासराव बँकेच्या भव्य प्रवेशद्वारातून आत शिरले. "गुड मॉर्निंग. वेलकम टु अवर बँक, मिस्टर चीफ मिनिस्टर..." करड्या रंगाचा सूट घातलेल्या एका उमद्या तरुणानं त्यांचं स्वागत केलं. "चेअरमन तुम्हाला पाचच मिनिटात भेटतील. जरा बसून घ्या, प्लीज. तुमची ब्रीफकेस आणि पाऊच मी घेऊ का हातात?"
"अं.. मला वाटतं ते माझ्याकडंच राहू द्यावं" विश्वासराव म्हणाले. किंचित अनिश्चिततेनं.
"जशी तुमची मर्जी. कॉफी?"
विश्वासरावांची कॉफी संपेपर्यंत चेअरमनच्या केबीनचा दरवाजा उघडला. पांढऱ्या विरळ केसांचे, संपूर्ण पाश्चिमात्य वेशभूषा केलेले सत्तरीतले चेअरमन बाहेर आले. म्हातारा अजून लिंबाच्या खोडासारखा टणक होता. "विश्वासराव जगदाळे, राईट?" त्यांनी हात पुढे केला. अगदी अचूक उच्चार. सकाळच्या फोननंतर आतापर्यंत जेमेतेम काही तास उलटले होते. तेवढ्यात आपल्या नावाचा उच्चारदेखील शोधून काढला या लोकांनी! विश्वासरावांना प्रथमच आपल्या कामाच्या यशाविषयी शंका आली. "आपण, आत बसू या का?" चेअरमन म्हणाले.  
आतल्या खोलीत दोन तरुण होते.
चेअरमननी त्यांची ओळख करुन दिली. "ही माझी मुलं."
"विश्वासराव जगदाळे"
"चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, इंडिया." चेअरमन म्हणाले. "आपण बसू या का?"
विश्वासरावांनी घड्याळात बघीतलं. "मी आपला फारसा वेळ घेणार नाही चेअरमनसाहेब.  मला आपल्याकडून काही माहिती हवी आहे."
चेअरमनच्या कपाळावर एक आठी आली. "माहिती?"
विश्वासरावांनी सरळ मुद्द्याला हात घातला. महाराष्ट्रातला सत्तापालट, नवीन मंत्र्यांवरचा संशय, यशवंतचा रिपोर्ट... सगळंच. चेअरमन शांतपणे ऐकत होते.
"चेअरमनसाहेब, यातली काही खाती आपल्या बँकेत असावीत असा आमचा अंदाज आहे. मामला कदाचित लक्षावधी डॉलर्सचा असेल..."
"मग?" चेअरमन साहेबांचा स्वर अगदी कोरडा होता.
"मला ही माहिती हवी आहे, चेअरमनसाहेब." विश्वासरावांनी यशवंतने पाठवलेली लिस्ट बाहेर काढली. "आपल्या बँकेत यापैकी कुणाकुणाची खाती आहेत, त्यातल्या रकमा आणि त्यांची लेटेस्ट ट्रान्झक्शन्स."
"मिस्टर चीफ मिनिस्टर.." (आता 'विश्वासराव' नाही, विश्वासरावांच्या ध्यानात आलं)," "तुमच्याकडून असल्या बाळबोध गोष्टींची अपेक्षा नव्हती मला" चेअरमन कठोरपणे म्हणाले. "स्विस बँकांविषयी तुमचा काय समज आहे, मला माहिती नाही, पण गुप्तता हे आमचं पहिलं तत्त्व आहे. आमच्या ग्राहकांविषयी कसलीही माहिती आम्ही तो ग्राहक किंवा त्याच्या मृत्यूनंतर त्याचे कायदेशीर वारस याशिवाय कुणालाही देत नाही."
विश्वासरावांची हीच अपेक्षा होती. त्यांनी खिशातून एक पत्र बाहेर काढलं. " हे जरा बघता का..." ते म्हणाले. "आमच्या पंतप्रधानांचं तुमच्यासाठी खाजगी पत्र आहे..."
"काय उपयोग आहे त्याचा मिस्टर चीफ मिनिस्टर?" चेअरमनसाहेबांचा दहा मिनिटांपूर्वीचा मृदूपणा आता अगदी मावळला होता. "माझ्या लेखी तो फक्त एक छापील कागद आहे" ते म्हणाले. "तुमच्या देशात तयार झालेला एक कागद फक्त. अशा गोष्टी इथं होत नसतात, मिस्टर चीफ मिनिस्टर. आता तुमचं जर दुसरं काही काम नसेल, तर आपण उठू या का?"
"एक मिनिट चेअरमनसाहेब" विश्वासरावांच्या नजरेत आता कणखरपणा आला. "तुम्हाला माहिती असेलच. आमच्या देशात इनफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची मोठी कामं सुरु आहेत. एका मोठ्या, फारच मोठ्या धरणाचा एन्व्हायरमेंटल इंपॅक्ट सर्व्हे आहे, साडेचार हजार किलोमिटर लांबीचा फ्रीवे बांधायचा आहे, इतरही काही कामं आहेत... त्यातली बरीच कामं स्टीवन्सन असोसिएटसकडं आहेत. तुम्ही त्यांचे बँकर आहात, मिस्टर चेअरमन. तुम्ही जर असं आखडूपणाचं धोरण स्वीकारणार असाल, तर आम्हाला ही कामं स्टीवन्सन असोसिएटला द्यायची की नाही याचा परत विचार करावा लागेल..."
चेअरमन आता कंटाळल्यासारखे झाले होते. "तो तुमचा प्रश्न आहे, आमचा नाही. असलं काहीतरी सांगून तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करू शकत नाही." 
"आणि अर्थातच तुम्ही सहकार्य करणार नसाल, तर तुमच्या देशाशी असलेले सगळे राजकीय संबंध तोडायलाही आम्ही मागेपुढे बघणार नाही" विश्वासराव म्हणाले.
"हे जरा जास्तच होत नाही का मिस्टर चीफ मिनिस्टर? पण असो, आता मला तुम्हाला सांगणं भाग आहे, की तुम्ही माझा वेळ वाया घालवताय. तुमच्या असल्या कुठल्याही घाणेरड्या मार्गानं तुम्ही आमच्या क्लायंटची माहिती मिळवू शकणार नाही."
"हम्म..." विश्वासरावांनी पाऊच उचलला. "आता सगळे मार्गच खुंटले म्हणायचं"  चेअरमनसाहेबांनी हात पुढे केला आणि ते जागेवरच थिजले. विश्वासरावांच्या हातात आता रिव्हॉल्व्हर होतं.
"दोन मिनिटांच्या आत मला पाहिजे ती माहिती मला मिळाली पाहिजे, चेअरमन. नाहीतर तुझ्या चिंधड्या उडतील..."
चेअरमन आणि त्यांचे दोन्ही सहकारी अविश्वासानं बघत होते.  चेअरमनच्या चेहऱ्यावर आता घामाचे लहानबिंदू दिसू लागले. टेबलवरचा त्यांचा हात आता सूक्ष्मपणे थरथरु लागला होता. पण त्यांनी तरीही नकारार्थी मान हलवली.
"प्लीज, चेअरमनसाहेब, ही माहिती माझ्या दृष्टीनं खूप आवश्यक आहे. माझं राजकीय भवितव्य, माझ्या लोकांचं भविष्य, माझं आयुष्यच अवलंबून आहे यावर..." विश्वासराव अगतिकतेनं म्हणाले.
"माझंही... पण, नाही." घामानं डबडबलेले चेअरमन म्हणाले.
"ठीक आहे मग... आता भोगा याची फळं" विश्वासरावांनी चाप ओढला. चेअरमननी डोळे मिटले....

हॉलीवूड मध्ये मराठी संजीवक

कालच्या म.टा. मध्ये हा बातमीवजा लेख वाचायला मिळाला आपला एक मराठी युवक "पायरेट्स ऑफ द कॅरिबियन" चित्रपटातल्या संजीवनाशी (ऍनिमेशन) संबंधित असावा ही गोष्ट मला आनंदाची आणि मौजेची वाटली. आपल्या आस्वादासाठी हा लेख येथे उतरवून ठेवत आहे.

शासकीय जन्मतारखेच्या निमित्ताने

आज १ जून. शासनाच्या धोरणानुसार ज्यांची जन्मतारीख उपलब्ध नाही अशा सर्वांची जन्मतारीख १ जून धरली जाते. त्या अर्थाने आज कित्येकांचा वाढदिवस असेल. काही मनोगतीही त्यांत असतील. अशा सर्वांचेच मन:पूर्वक अभिनंदन.

माझीही अपूर्वाई - भाग ५

मी जिथे उतरलो होतो ते विश्रामधाम हे एक चार पांच खोल्यांचे घर होते. दिवाणखान्यामध्येच दरवाजाजवळ एक टेबल खुर्ची मांडून व बाजूला छोटासा आडोसा करून कामचलाऊ कार्यालय बनवले होते. त्याच्या पलीकडे चार खुर्च्यांचे जेवणाचे टेबल होते. भिंतीला लागून एक लांबट आकाराचे टेबल होते. त्यावर मोरंबे, चटण्या वगैरेच्या बाटल्या आणि कांचसामान ठेवले होते. दुसरे दिवशी सकाळी त्यावर मक्याचे पोहे, दूध, भाजलेले पाव, लोणी वगैरे मांडून ठेवलेले मिळाले. एका बाजूला स्वयंपाकघर होते. त्यात मी पूर्वी कधी न पाहिलेल्या आकारांच्या भट्ट्या व विजेचे तवे होते. दुसऱ्या बाजूला मार्गिकेला लागून असलेल्या स्वयंपूर्ण निद्राकक्षांमध्ये दोन दोन लोकांच्या रहाण्याची व्यवस्था होती. माझ्या वास्तव्याच्या काळात तरी मला दुसरा कोणी पाहुणा भेटला नाही. कदाचित मी फारच थोडा वेळ विश्रामालयात घालवत असल्यामुळेही तसे झाले असेल. वरच्या मजल्यावर मालक रहात होता व तो आपल्या कुटुंबाच्या सहाय्याने ते  विश्रामधाम चालवत होता. इतर कोणी नोकरवर्ग केंव्हाही दिसलाच नाही. अशा प्रकारची कौटुंबिक विश्रामालये युरोपात चांगलीच प्रचलित आहेत व मध्यमवर्गीय प्रवाशांना अल्प खर्चात चांगली रहाण्याची सोय ती उपलब्ध करून देतात.

ग्राफिटी..!!

गेले काही दिवस 'सकाळ' मध्ये 'ग्राफिटी' नावाचा  एक छोटासा  कॉलम प्रकाशित होतो आहे. तशी ही संकल्पना खुपच छान आहे. सुरु झाल्यापासुनच माझ्यासारख्या वाचकांसाठी तो एक  Must Read प्रकार झाला आहे....त्यातीलच काही निवडक कॉलम्स आपणापुढे देत आहे...

सोडून मोकळे

रामायणात सीता अशोकवनात केस मोकळे सोडून बसलेली दाखवतात. महाभारतात द्रौपदी केस मोकळे सोडून पांडवानी कौरवांचा सूड उगवल्याशिवाय  केस बांधणार नाही अशी प्रतिज्ञा करते . अलिकडे स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसिद्ध झालेल्या एका कवितेत शोकाकुल भारतमाता " सोडून मोकळे माथ्यावरचे केस " अशी बसली असल्याचे वर्णन आहे.थोडक्यात केस मोकळे सोडण्याचा दु:ख , क्रोध किंवा अशुभ याच्याशी संबंध आहे असे समजण्यात येत होते.