'आपलं'

परवा बाजारातून घरी येताना असं दिसलं कि, रस्त्यावर एक कुटुंब पाहिल. काहितरी एकमेकाना दाखवत त्यांची आपापसात चर्चा चालली होती. मी सुद्धा कुतुहलापोटी त्यांच्या बाजूला उभा राहून ते काय पाहतायत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं कि तिथे एक बोर्ड लावला आहे ज्यावर त्या विभागातल्या सर्व इमारतींचं नेमकं स्थान(लोकेशन) दाखविलं आहे, पण नाव न लिहिता नुसते भूखंड क्र. टाकले होते. आणि ते कुटुंब त्यातून ते रहात असलेली म्हणजे 'आपली' इमारत शोधण्याचा प्रयत्न करत होते.

यॉर्कशायर रिपर

एखाद्या मुलीला किंवा महिलेला इमारतीच्या जिन्यांत एकटीला गांठून तिच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार करून तिला लुटण्याच्या वाढत्या प्रकारांनी अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगांव भागांत गेला महिनाभर दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या महिलेची पर्स, मोबाईल, गळ्यातील सांखळी अशा गोष्टींच्या चोरीसाठी विकास टाक नांवाचा १९ वर्षाचा  पोरगा हे निर्घृण कृत्य  करीत होता असे आता उघडकीस आले आहे. हांतातील हातोड्याने नेमका डोक्यावर नाजुक जागी घणाघात करून महिलांना एका फटक्यात जबर जखमी करण्याच्या तंत्राचा "विकास" त्याने केला होता. अशाच प्रकारे हल्ला करून पळ कांढतांना तो पकडला गेला. सुदैवाने त्याने जखमी केलेल्या महिलांना वेळेवर योग्य वैद्यकीय सहाय्य मिळाले व निदान त्यांचे प्राण तरी वांचले.

दिन विशेष

१४ नोव्हेंबर म्हटल की पंडित नेहरूच नाव डोळ्यांसमोर पटकन उभं राहतं . पण बऱ्याचदा आपल्याला भावलेल्या व्यक्तींचे जन्म ,मृत्यू माहीत नसतात अस बऱ्याचदा होत. किंवा बऱ्याच चांगल्या व्यक्ती आणि प्रसंग स्मृती आड होतात .  प्रत्येक दिवसाचं अस काही एक वेगळेपण असतं , ते वेगळेपण शोधण्याचा नोंदवण्याचा आणि वेळेवर आठवण देणारा प्रकल्प मराठी विकिपीडियावर दिन विशेष या नावाने आकार घेतोय  मात्र ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार . तुम्हाला भावलेले स्मरणात आलेले काही दिवस व संबंधित प्रसंग,घटना,जन्म दिवस(स्वतः चा सोडून) जरूर नमूद करावेत. विकिपीडिया त्याची दखल घेण्यास निश्चित उत्सुक असेल.नोव्हेंबर ,  डिसेंबर च्या दुव्यांवर टिचकी देऊन येणारे दिवस पहा आणि काही नवीन आठवतात का ते कळवा.

इ-गव्हर्नन्स - तळागाळातले अनुभव

गुड गव्हर्नन्स ( सुराज्य) आणि इ-गव्हर्नन्स (मराठी शब्द सुचवा) बद्दल अलिकडे बरेच काही बोलले, लिहीले, वाचले जाते. इ-गव्हर्नन्स म्हणजे माझ्या मते दळणवळणाची अत्याधुनिक साधने (उदा.-संगणक) वापरून शासकीय कारभार अधिक पारदर्शी करणे, शासकीय सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे, प्रसारमाध्यमांचा वापर इ.  यामध्ये या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर माहितीचा अधिकार सुलभपणे वापरता यावा म्हणून करणे, हे ही आलेच.   इ-गव्हर्नन्स चा अवलंब यशस्वी प्रकारे केल्याचे फुरसुंगी ग्रामपंचायतीचे उदाहरणही आपल्याला कदाचित माहिती असेल. (संगणकीकृत ग्रामपंचायत) अशी काही गाव पातळीवरची किंवा छोट्या शहरांमधील उदाहरणे कोणी सांगू शकेल का?

चहा एके चहा......

आमच्या लहानपणी (म्हणजे सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी) लहान मुलांनी चहा, कॉफी, असली उत्तेजक पेये पिण्यास वडील माणसांचा खूप विरोध असायचा. मुलांनी दूधच प्यायला हवे असा आग्रह असे. त्यावेळी चहा कॉफीचे (बहुधा) दुष्परिणाम सांगणारे एक बडबडगीत मी ऐकले होते. ते असे:

जाईन विचारत रानफुला

आज एक रानफुलांचे छान प्रदर्शन नेटवर पाहिले.  त्यातील मला आवडलेले एक छायाचित्र देण्याचा प्रयत्न करीत आहे. यशस्वी होतो का पहावे. झाल्यास आणखी देता येतील. न झाल्यास क्षमा करावी. 


लाजाळूचे फूल

http://image57.webshots.com/557/0/18/14/2203018140039481946YtDSfe_fs.jpg