(१२ जुलै २००६ रोजी मीच इंग्रजीमध्ये लिहिलेल्या ब्लॉगचे मराठी रूपांतर)
समजा एक माणूस महिना दीड महिना गंभीर आजाराने अंथरुणाला खिळून आहे, त्यातून सावरतांना त्याच्या एका हाताने भिंतीला धरून हळू हळू एक एक पाऊल टाकीत बेडरूमपासून दिवाणखान्यापर्यंत धडपडत येण्याचे सुध्दा एखाद्या वर्षभराच्या बाळाने केलेल्या प्रगतिसारखे तोंड भरभरून कौतुक होते आहे, जागीच बसल्या बसल्या कांही करावे म्हंटले तर दीड महिन्यापासून त्याच्या कॉंप्यूटरनेही दगा दिला आहे, अशा परिस्थितीत त्याचा एक संपूर्ण दिवस अतिशय धामधुमीचा गेला असे होऊ शकेल? काल माझ्या बाबतीत अगदी अस्संच झालं.