कोटीच्या-कोटी-भाग-३
जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मधील सगळे जण 'जे जे' करतात ते सुंदरच असते, नाही?
*******************
आमच्या शेजाऱ्यांची सून सारखी मालाडला तिच्या माहेरी जात असते, म्हणुन आम्ही तिला, "तिथे तुझी 'मा' तुझे खुप 'लाड' करते, म्हणून तु नेहमी मालाडला जातेस" असे म्हणतो.
********************
आमच्या ऑफिसमधील एक स्टेनो त्याच्या अनेक मैत्रीणींशी सतत मोबाईलवरुन बोलत असतो; त्याचे नाव सध्या '(मो)बाईलवेडा' असे पडले आहे.
*********************
सध्याची महागाई बघता परमेश्वराला 'भवसागर' पार करण्यापेक्षा 'भावसागर' पार करण्यासाठीच साकडे घालावे असे वाटतेय.
********************
काही वर्षांपूर्वी एका खाणावळीत जेवायला जात असू; 'अन्नपुर्णा खाणावळ'.