ब्रॉवझार

ब्रॉवझार नावाच्या एक वैशिष्ट्यपूर्ण न्याहाळकाबद्दल(browser) नुकतंच वाचलं. फक्त २७३ केबीच्या या न्याहाळकाची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:

चला इतिहास लिहूया..(आपल्याला हवा तसा..)

पु. लंच्या एका लेखात असा उल्लेख आहे,"शेक्स्पिअरचं थडगं अमेरिकेत आहे, मी ह्या डोळ्यांनी पाहिले आहे..."असे अतिविशाल म.मंडळाच्या त्या बाई म्हणाल्या..(अचूक शब्द आठवत नाहीत,पण गोषवारा असा आहे.)
आम्हालाही अशा काही व्यक्ती भेटल्या ज्यांनी इतिहासाची ऐशीतैशी अगदी छातीठोकपणे 'बर्लिन' च्या भूमीवर केली..त्यातून ही भन्नाट कल्पना सुचली.

एका मराठी चित्रपटाचा सुवर्णमहोत्सव

मराठी चित्रपटाचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असल्याची बातमी काल सकाळात वाचून फार आनंद झाला. तुम्ही पण वाचा.



"काय द्याचं बोला'ला सुवर्णझळाळी! पुणे, ता. ९ - एक्कावन्न दिवस, शंभर दिवस, रौप्यमहोत्सव अशी वाटचाल करत गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला "काय द्याचं बोला' हा चित्रपट उद्या (ता. १०) पुण्यात पन्नासाव्या आठवड्यात पदार्पण करीत आहे. "सुवर्णमहोत्सव' साजरे करण्याचे भाग्य मराठी चित्रपटाच्या वाट्याला अनेक वर्षांनी येत आहे. .......
गेल्या वर्षी सर्वप्रथम मराठवाड्यात "काय द्याचं बोला' प्रदर्शित झाला होता. तेथे या चित्रपटाला चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर पुण्यामध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित झाला. निखळ विनोदी कथा, त्याला मिळालेला अस्सल ग्रामीण भाषेचा साज आणि मकरंद अनासपुरेचा सहज अभिनय, यामुळे अल्पावधीतच चित्ररसिकांचा त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.

अनेक वर्षांनी सुवर्णमहोत्सवी टप्पा पार करण्यात यश आल्याचे समाधान आहेच, असे सांगून या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, ""मराठीत एखाद्या चित्रपटाची संकल्पना आवडली, तर त्याला नेहमीच प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद लाभतो, यावर "काय द्याचं बोला'मुळे शिक्कामोर्तबच झाले आहे. चकचकीतपणा किंवा उच्च तांत्रिक मूल्ये, या सर्वांपेक्षाही चांगला आशय चित्रपटात असल्याने प्रेक्षकांनी त्याला उचलून धरले. कोणत्याही एका भागासाठी चित्रपट न बनविता शहर, तालुका आणि खेडे येथील प्रेक्षकांचा "लसावि'काढून बनविला, तर तो यशस्वी होतो, हेच यातून अधोरेखित होते.''

मराठी चित्रपटांना अलीकडे जे काही आर्थिक यश लाभते आहे, त्यामध्ये पुणेकर चित्ररसिकांचाही मोठा वाटा आहे, असेही श्री. कुलकर्णी यांनी नमूद केले.

सुरवातीला चित्रपट शंभर दिवस चालेल का, अशी भीती वाटत होती; पण आजवर मिळालेले यश अपेक्षेपलीकडील आहे, असे निर्माते डॉ. उदय ताम्हनकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ""सर्व कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल, अशी निखळ करमणूक असल्याने या चित्रपटाला "रिपीट' प्रेक्षकही मिळाला. पुणेकर प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चित्रपटाचे आर्थिक गणितही अडचणीचे ठरले नाही.''

""नायक म्हणून मिळालेल्या पहिल्याच चित्रपटाला सुवर्णमहोत्सवी यश लाभले ही सर्वांत आनंदाची गोष्ट आहे. मुंबईमध्ये बारा वर्षे केलेली तपश्‍चर्या फळाला आली,'' असे या चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्या मकरंद अनासपुरे याने सांगितले.

तपश्‍चर्या फळाला आली - मकरंद अनासपुरे
चांगल्या आशयामुळे प्रतिसाद - चंद्रकांत कुलकर्णी
पुणेकरांमुळे आर्थिक गणित जमले - उदय ताम्हनकर

आगळावेगळा पक्षी -३

दक्षिण अमेरिकेतील पेंग्विन्स
चिली आणि अर्जेंटिनाच्या किनाऱ्यांवर मॅगॅलॅनिक पेंग्विन्स व हम्बल्ट पेंग्विन्स आढळतात. याशिवाय फॉक्लंड बेटांवर जेंटू, रॉकहॉपर,मॅगॅलॅनिक आणि मॅकरोनी पेंग्विन्स आढळतात. यापैकी जेंटू पेंग्विन्सची माहिती आपण आधी करून घेतली आहे.

सांस्कृतिक राजधानीची पडझड ....

'लोकसत्ता' चा लेख चर्चेच्या प्रस्तावासाठी ठेवत आहे.


 


मुंबईनंतर पुणे हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महानगर म्हणून ओळखले जाते. राज्याची सांस्कृतिक राजधानी किंवा विद्येचे माहेरघर म्हणून पुणे आजही प्रसिद्ध आहे. दहा-पंधरा वर्षांत पुण्याचा विकास झपाट्याने झाला. पुण्यात उभ्या राहिलेल्या व नावाजलेल्या शिक्षणसंस्थांनी देशभरातील विद्यार्थ्यांना आकषिर्त केले. एक औद्योगिक शहर म्हणून पुण्याने लौकिक प्राप्त केला आहेच. आयटी क्षेत्रात पुण्याने विलक्षण झेप घेतली. अन्य शहरांच्या तुलनेत पुणे अधिक समृद्ध झाले.

अनंताची कहाणी

अनंताची कहाणी


"आता साधं घर घ्यायचीच गोष्ट बघा! त्यात अनंत अडचणी!"
असं आपण किती सहजपणे म्हणतो. पण खरं तर अडचणी अनंत नसतात. त्यांची संख्या प्रचंड मोठी असली तरी ती अनंत नसते. आपल्याला जेव्हा एखादी संख्या खूप मोठी वाटत असते तेव्हा आपण तिला बोलीभाषेत अनंत म्हणतो आणि कोणती संख्या कोणाला अनंत वाटते हे फारच सापेक्ष असते. हे त्या त्या व्यक्तीवर, बोलतानाच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असते. पण गणितातील अनंत मात्र असे नसते.

ईशान्य भारतातील राज्ये.

ईशान्य भारतातील राज्ये कायम दुर्लक्षित भाग राहीला आहे. तेथिल युवकवर्ग अंमली पदार्थांच्या आहारी गेला आहे. तेथिल भाग  बंडखोरांनी ग्रासला आहे. आपण नेहमी पाहतो आपल्या दुरदर्शनवरील बातम्यांमध्ये(खासगी वाहिन्याही ) या भागातिल बातम्या नसतात. मध्ये वर्तमान पत्रात वाचले होते की तिकडील तरूणांत आपण भारताचा भाग नाही ही भावना बळावत चाललीय.