रुखवत

             नुकतंच माझ्या मैत्रिणीचं लग्न ठरलं आणि इतर चर्चांप्रमाणे रुखवताची चर्चा देखील सुरु झाली. तिच्या स्वत:च्या मताप्रमाणे- '' मी काहीही या गोष्टीत पैसे आणि वेळ वाया घालवणार नाहीए त्या पेक्षा मी होणार्‍या नवर्‍याला फोन करुन तासं तास गप्पा मारीन त्यामुळे आमच्यात विचारांची देवाण घेवाण होईल आणि आमचे भावनिक बंध पक्के व्हायला मदत मिळेल, त्या भरतकामाच्या आणि विणकामाच्या चिटूक मिटूक वस्तूंचं काही महत्व उरणार नाही.

तुम्हाला काय 'वाटत्ये', काय 'म्हणायच्ये'?

'नाहीये', 'होत्येय', 'झाल्येय' सारखी भाषा आजकाल लिखाणात जिथेतिथे दिसते. एका ठिकाणी वाचलेल्या हा 'निनावी' ओळी -


अजून कुठे रात्र पुरती हरल्ये
अजून कुठे तहान पुरती सरल्ये
अजून एकदा तुला डोळ्यांनी पिऊन घेऊ दे..
मग लिहीन की कविता..

अप्पासो व फ़ारा वर्ष

१.मी अनेक ठिकाणी वर उल्लेख़ केलेले शब्द "अप्पासो" (ख़रं म्हणजे 'स' अक्षराला दोन काना व मात्रा असलेले पाहिले आहे. हे असे असलेले अक्षर कुठले?) व हा शब्द 'आप्पासाहेब' या शब्दाचे लघुरूप आहे का?


२.तसंच दुसरं- बऱ्याच ठिकाणी 'फ़ारा वर्षांपूर्वी' असा उल्लेख़ आढळतो. 'फ़ार' व 'फ़ारा' यांत काय फ़रक आहे?

भारतीय व्यंगचित्रकार

मराठी व्यंगचित्रकाराचे कोणते संकेतस्थळ आहे का? ज्यावर मराठी व्यंगचित्रे उपलब्ध असतील, असल्यास अशा प्रकारच्या मराठी व्यंगचित्रकारांच्या संकेतस्थळाबद्दल  माहिती कृपया द्यावी ही विनंती.


मराठी व्यंगचित्रकाराचे कोणते संकेतस्थळ आहे का? ज्यावर मराठी व्यंगचित्रे उपलब्ध असतील, असल्यास अशा प्रकारच्या मराठी व्यंगचित्रकारांच्या संकेतस्थळाबद्दल  माहिती कृपया द्यावी ही विनंती.

ही कविता वाचली का?

नुकतीच एक कविता वाचण्यात आली. आवडली म्हणून देत आहे.


निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले


काही पिण्यात गेले.... काही पुण्यात गेले.


कवि :- अशोक नायगांवकर


अशा आणखी कविता असल्यास प्रकाशित कराव्या

अमेरिकेतल्या निवडणुका

कालच इथल्या निवडणुका पार पडल्या.  लोकसभा (काँग्रेस), राज्यसभा (सिनेट) आणि अध्यक्षपद असा तिहेरी सत्तेचा सहा वर्षाचा काळ संपुष्टात येऊन इथल्या डेमॉक्रॅटिक पक्षाने रिपब्लिक पक्षाची सत्त २/३ हस्तगत केली आहे. (अजून सिनेटचे भवितव्य पुरे स्पष्ट नाही, पण त्यात डेमोक्रॅट सध्या आघाडीवर आहेत).  २००८ साली त्यांना अध्यक्षपद सुद्धा मिळवता येईल अशी शक्यता वाटते आहे.

साहित्य संरक्षण व प्रताधिकार कायदा

रावसाहेबांनी जीएंची माणूस नावाचा बेटा ही दीर्घकथा येथे आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिली. त्यांच्या चिकाटीचे आणि कष्टांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.


आपल्या आवडत्या लेखकांच्या कथा इथे टंकित करणे या उपक्रमात भाग घ्यायला मलाही जरुर आवडेल. मात्र माझ्या काही (कु)शंका आहेत.

तेहतीस कोटी देव ?

आपण असे ऐकतो-वाचतो वा बोलतोही की देव तेहतीस कोटी आहेत. मला या "तेहतीस कोटी देवता" संकल्पनेची माहिती कोठे मिळू शकेल, हे जाणून घ्यायचे आहे. कोटी ही संख्या आहे असे मानल्यास इतक्या देवांची नावे, अवतारकथा, हे सारे शोधावे लागेल. कोटी या शब्दाचा अर्थ 'प्रकार' असाही आहे, त्या अर्थाने कोटी हा शब्द वापरला जात असल्यास हे तेहतीस प्रकार कोणते, त्यांच्यातील भेद नेमके कसे केले गेले हे सर्व माहिती करून घ्यायचे आहे.