वाढणी
१पोळ्यांचा डबा भरून शंकरपाळे होतात.
पाककृतीला लागणारा वेळ
150
जिन्नस
- १ वाटी दूध,१ वाटी पिठीसाखर,३/४ वाटी तूप,१/२ चमचा मीठ,
- १ टे-स्पून कणीक,मावेल तेवढा मैदा,तळणीसाठी तूप/तेल
मार्गदर्शन
तूप,साखर,मीठ एकत्र करून फेसून घ्या.त्यात कणीक,दूध आणि मावेल तितका मैदा घालून भिजवा.तो गोळा ३०-३५ मिनीटे झाकून ठेवा. नंतर लाटून शंकरपाळे कापा व तळा.
टीपा
मी आजच या पद्धतीने शंकरपाळे करून पाहिले,खूपच खुसखुशीत झाले आहेत.म्हणून मनोगतींसाठी ही पा.कृ. इथे लिहिली..