आम्ही जर्मनीत आलो,तेव्हा सुरुवातीला घराची सोय होईपर्यंत वोनहाईम मध्ये राहत होतो.(वोन=वसती,हाईम=घर : वसतिगृह!)एक किवा दोन खोल्या,दोन खोल्या असतील तर एक झोपायची खोली,आणि दुसरी बैठकीची; त्याच खोलीत एका कोपऱ्यात स्वयंपाकाची शेगडी,छोटेसे शीतकपाट,मायक्रोवेव आणि भांडी ठेवण्यासाठी मांडणी! नोकरीच्या निमित्ताने एकेकटे लोक जेव्हा शहरात राहतात,आणि शनि-रवि( खरं तर शुक्रवारीच )घरी पळतात,सोमवारी थेट कामावर जातात,अशा लोकांसाठी ही वसतिगृहे खरचच चांगली आहेत.