दीपावलीच्या सर्व मनोगतींना शुभेच्छा देऊन मी मनोगतावर प्रवेश करत आहे. तसा सभासद मी काही दिवसांपूर्वी झालोय,पण संगणकी मराठी लिहायची सवय नाही ना! आणि मी लेखक ही नाही.मी आस्वादक !असो.
आपण जगात नसल्याचा आभास निर्माण करून लोकांच्या भावनांशी खेळणारी साध्वी सिद्धीश्रीजी ऊर्फ समता (२२), तिचा प्रियकर कम अंगरक्षक रजनीकांत तलवार ऊर्फ रज्जूभाई आणि त्याची आई यांना मंगळवारी अमरावती पोलिसांनी सांगलीत नाट्यमय अटक केली. साध्वी सिद्धीश्रीजी यांचे अमरावतीच्या जनार्दन पेठमधील ओसवाल भवन येथे रविवारी पहाटे झोपेत भस्म झाल्याच्या कथित चमत्कारामुळे भस्माच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी रांगा लागल्या. मात्र, या प्रकारामागे काहीतरी काळेबेरे असावे, असा संशय आल्याने अमरावती पोलिसांनी रजनीकांतला अमरावतीमध्ये ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या कबुलीजबाबाने पोलिसही हादरले.
इतर देशांच्या तुलनेत भारतात घटस्फोट घेण्याचे प्रमाण बरेच कमी आहे.(आता तेही हळूहळू वाढू लागले आहे) या कमी प्रमाणाचे कारण आपण आपल्या संस्कृतीत(मानसिकता) आहे असे समजतो.पण खरे पहाता आपल्याकडे घटस्फोटाचा कायदा जटील आहे त्यामुळे घटस्फोट मिळणे अवघड जाते.
त्सुनामी खोल पाण्यामध्ये निर्माण होतात, आधी खोल समुद्रातून वाहतात, नंतर किनाऱ्याजवळ उथळ पाण्यामधून वाहतात आणि किनाऱ्यावर येऊन आदळतात. किनाऱ्याजवळ ह्या लाटांचे स्वरूप खरोखरीच "डोंगर लाटा" असे असते.
मी देव मानत नाही. पण देवळाशी मात्र माझे सख्य आहे. जिथे वेगवेगळ्या वारी,वेगवेगळ्या वेळी निरनिराळ्या माणसांची ऊठबस होते अश्या ह्या घरात देवाचे वेगळे अस्तित्व कुठून दाखवणार? अजूनही मला एक प्रश्न नेहमी सतावतो; लोक स्वत्व विसरून देवाला शोधायला देवळात जातात असा माझा समज आहे.
सध्या म. श्री. दीक्षित लिखित "आम्ही चित्पावन" हे पुस्तक वाचतो आहे. त्यांच्या मते चित्पावन हा शब्द क्षितिपावन या शब्दापासून बनला. त्यांनीच चर्चा केल्याप्रमाणे हा शब्द 'चिपळूण' शब्दापासून अपभ्रंश स्वरूपात रूढ झाला असल्याचेही काहींचे मत आहे. क्षितिपावनपासून चितिपावन>चित्तिपावन>चित्तापावन>चित्तपावन>चित्पावन अशा क्रमाने व्युत्पत्ती मिळू शकते. मात्र चिपळूण शब्दापासून चित्पावन हा अपभ्रंश कसा झाला हे कळू शकत नाही. मूळ शब्दाचा अपभ्रंश बनण्याची क्रिया कशी असते याविषयी कोणी माहिती देऊ शकेल का?
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.