ऐकावे ते नवलच- अमेरिकेतील पूल
पुलांच्या माहितीत पूल कोठे आहे, पूल कोणी व केंव्हा बांधला ते सांगितलेले असते. शिवाय त्या पुलाच्या बांधकामासाठी वापरलेले तंत्रज्ञान आणि बांधकामासाठी जर विशेष साहित्य वापरले असेल तर त्याची नोंद असते. बरेचदा पुलाच्या दोन टोकामधील अंतर (लांबी) आणि पुलाची उंची , रुंदी ही महत्त्वाची परिमाणे सुद्धा दिलेली असतात. आतापर्यंत बहुतेक सर्व पुलांविषयी ह्यापैकी जी माहिती मिळू शकली ती दिलेली आहे. या भागात अमेरिकेतील काही निवडक व प्रसिद्ध पुलांची माहिती करून घेऊ या.