उत्तर: तराजू तीनदा वापरायचा आहे म्हणजे तीनदा तोलता येणार. पहिल्यांदा आठपैकी कुठलेही तीन चेंडू एका पारड्यात ठेवा आणि कुठलेही इतर तीन चेंडू दुसऱ्या पारड्यात ठेवा. उर्वरित दोन चेंडू खालीच असू देत.
ह्यावेळी समजा तराजूचा काटा मध्यावरच राहिला तर खाली ठेवलेल्या दोन चेंडूंपैकी कुठला तरी एक हलका किंवा जड आहे. असे असेल तर दुसऱ्या तोलण्यात तेच दोन चेंडू प्रत्येक पारड्यात एक एक असे ठेवा आणि तोला. एक पारडे खाली जाईल तर दुसरे वर. मग वर गेलेल्या पारड्यातील चेंडू काढून घेऊन त्या जागी एक प्रमाण चेंडू ठेवा. मग तोला. हे तोलणे तिसरे तोलणे असेल. पारडे वर गेल्यास पहिल्या पारड्यातील चेंडू इतरांपेक्षा जड असणार. पारडे खाली जाणारच नाही. कारण फक्त एकच चेंडू वेगळा आहे. मात्र आता पारडे बरोबरीत राहीले तर दुसऱ्या तोलण्यात वर गेलेल्या पारड्यातील चेंडू वेगळा ठरेल. हलका ठरेल.
दैनिकांत काम करत असताना घाई गडबडीत कोणते गोंधळ होतात आणि त्यातून कोणच्या गंमती होतात त्याचाच हा एक नमूना.
मी प्रत्यक्ष अनुभवलेला.त्या शहरात आप्पा रणखांबे ( नांव बदलले) नावाचे एक वयोवृद्ध सर्पमित्र राहतात. त्यांचे वय 78 च्या आसपास असेल. अशाही परिस्थितीत शहराच्या कुठल्याही भागात, कुणाकडे सर्प, नाग वगैरे प्राण्यांनी हजेरी लावली की ते हक्काने अप्पांना फोन करतात आणि आप्पा स्व:खर्चाने तेथे जाऊन सर्पांना पकडतात. त्यामुळे तो सर्प व ज्याच्या घरात सर्प निघातो तो, असे दोघांनाही दिलासा मिळतो. अप्पांविषयी सर्व शहराबद्दल आदर आहे.
सुमारे दोन तीन वर्षांपूर्वी अप्पा असेच एका ठिकाणी साप पकडण्यासाठी गेले. भला विषारी नाग होता तो. चावला आप्पांना. त्यांना शहरातीलच मोठ्या रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी 48 तासांची मुदत दिली. समाजसेवा अप्पांच्या जीवावर बेतली. त्या दिवशी शहरातील सर्व दैनिकांनी त्याची दखल घेतली आणि आप्पांच्या बातमीला पहिल्या पानावर स्थान मिळाले. बातमी अशी होती- विख्यात सर्पमित्र अप्पा रणखांबे सर्पदंशाने अत्यवस्थ.' मी ज्या दैनिकात काम करत होतो त्या दैनिकातही ही बातमी 1ल्या पानावर प्रसिद्ध झाली होती.बातमी छापून आली त्याच दिवशी सायंकाळची गोष्ट. तशी मजेशीरच. अप्पांच्या तब्येतीची हालहवाल विचारून त्यासंबंधीची आणखी बातमी आपल्या दैनिकात दयावी म्हणून आमच्या एका स्मार्ट वार्ताहराने सायंकाळी रुग्णालयात फोन केला. दैनिकांत वेळा फार पाळाव्या लागतात. ठराविक बातमी ठराविक वेळेला द्यावीच लागते. त्यामुळे सायंकाळी येथे फारच घाईगर्दी आणि धावपळ असे दृश्य असते. आमचा हा वार्ताहर थेट दुसऱ्या दिवशीचे पान तयार करण्यासाठीच बसला होता आणि त्या जागेवरूनच त्याने रुग्णालयात फोन केला. "हॅलो, मी अमूक वार्ताहर बोलतोय, मला जरा अप्पांच्या तब्येतीबद्दल बोलायचेय. जरा त्यांच्या जवळच्या कुणाला बोलवता का? तिकडून उत्तर आले " अहो, आप्पा आत्ताच गेलेत'. अप्पा गेलेत असे म्हटल्याबरोबर या वार्ताहराने तसाच फोन ठेवून दिला आणि मोठ्या घाईने ती बातमी ऑफीसमध्ये सर्वांना सांगितली. अरेरे ! वाईट झाले, आमच्या प्रतिक्रिया.
बरे तो तर पान तयार करण्यासाठीच बसला होता. घाईतच त्याने संबंधीत डी.टी. पी. ऑपरेटरला हूकूम सोडला. हे बघ कालची जी बातमी होती ना ती तशीच ठेव. त्यात फक्त हेडिंग बदलून घे- आप्पा रणखांबे यांचे निधन- अशा पद्धतीने. मथळ्यात आप्पा अत्यवस्थ ऐवजी आप्पा निवर्तले असा बदल कर आणि जशीच्या तशी बातमी सोड. झाले ऑपरेटरनेही तसेच केले. अर्थात तोपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते आणि पानाची अंतिम वेळ 12 पर्यंतची होती.
एक बाई असते, तिच्या कडेवर एक लहान मुलगा असतो. त्या बाईला एक जण विचारते हा मुलगा तुमचा कोण लगतो? त्यावर ती उत्तर देते ह्याचा बाप ज्याचा सासरा त्याचा बाप माझा सासरा तर त्या बाईचे आणि मुलाचे नात काय असेल?
सारख्याच वजनाचे, आकार, प्रकार इत्यादी सर्वच बाबतीत एकदम सारखे असे बारा चेंडू आहेत. त्यांपैकी फक्त एक वजनात थोडा हलका किंवा जड आहे. तो शोधून काढायचा आहे. मात्र याकरता एक साधा तराजू उपलब्ध आहे जो फक्त तीनदाच वापरायचा आहे. आणि या चेंडू व तराजूव्यतिरिक्त इतर कुठल्याही वस्तूंचा आधार घ्यायचा नाही आहे. तर हे कसे करता येईल?
आणखी दोनच दिवसात म्युनीच, जर्मनी मध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचशकाच्या अंतिम सामान्यात नवा जगज्जेता उदयास येईल. अर्थातच तो नवा नसेल कारण फ्रांस ने याआधी एकदा तर इटली ने तीन वेळा विश्वचशक जिंकला आहे. तरीसुद्धा पुढील चार वर्षे ते जगज्जेते पदाचे बिरुद मोठ्या अभिमानाने जगभर मिरवतील. जगांतल्या ह्या सर्वात मोठ्या स्पर्धेत (फिफा ह्या जागतिक फुटबॉल संघटनेचे ऑलिंपिक आणि युनो पेक्षा जास्त सदस्य देश आहेत!) भारताचे कुठेच नाव नाही हे बघून फार वाईट वाटले आणि म्हणूनच हे लिहावेसे वाटले.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.