टोमॅटो - कैरीची चटणी

वाढणी
५ ते ७

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • १ टोमॅटो
  • १/२ कैरी किसून
  • १/२ वाटी ओलं खोबरं
  • १/२ वाटीपेक्षा थोडे जास्त भाजून सोललेले दाणे
  • २ हिरव्या मिरच्या
  • १ इंच आलं, १ लसूण पाकळी, १ चमचा जीरे पूड

मार्गदर्शन

- वरील सगळे जिन्नस एकत्र करून वाटावे. (मिक्सर म्हणायचे टाळले)

- तेल, हिंगं, सुकी लाल मिरची, आणि भरपूर कढीलिंब घालून फोडणी करावी

- फोडणी वरील वाटलेल्या मिश्रणात घालून चमच्याने मिसळावी. मग हे मिश्रण पुन्हा वाटावे

शेवटची हाक - ३

मी माझी नोकरी बदलली होती त्यामुळे राहायसाठी फ्लॅट शोधत होते ऑफीसच्या जवळच्याच भागात. खूप मुश्किलीने मला एक घर मिळालं. तिथे आसपास राहणारी मंडळी ही जास्तकरून मध्यमवर्गीय किंवा त्याखालच्या वर्गातलीच होती. प्रत्येकाला शेजारच्या घरातलं सगळं माहिती असायचं.

शेवटची हाक - १

"नीलू, मला उद्या एका मिटींगसाठी दिल्लीला जायचे आहे, तुला चलायचं असेल तर तूही चल. तसंही तुला तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाला जायला जमलं नव्हतं ना.. मग याच निमित्ताने तिला भेटून पोटभर गप्पा मारता येतील तुला. "
रितेशचं हे बोलणं ऐकून मनात एक अनामिक उत्साह संचारला.

शेवटची हाक - २

मागच्या वेळेस भेटलेली जबरदस्त नखरे असलेली अर्पिता आज अगदी भारतीय गृहिणीसारखी सामोरी आली होती ! एकदम छान नीटपणे घातलेली सुती साडी, वेणीत गुंफलेले केस, या सर्वाला साजेसा हलकासाच दागिन्यांचा पेहेराव.. एकूणतच एकदम नविन अर्पिता ! आमचा एकदम छान पाहुणचार केला तिने.

पुण्याजवळील प्रेक्षणीय स्थळे

पुण्याजवळील प्रेक्षणीय स्थळे ः थोडक्यात माहिती या संकेतस्थळावर मिळेल. आपल्याला आवडेल अशी आशा करतो. आणखी काही मिळाल्यास कळवेनच.


तुम्हाला देखिल काही चांगली स्थळे महिती असतील तर सुचवावीत.