भयगंडग्रस्त हिंदू

हिंदुस्थानांतील राज्यकर्त्यांत बहुसंख्येने असलेले हिंदू राज्यकर्ते व प्रसारमाध्यमे यांना मुसलमानांविषयी एक प्रकारचा भयगंड आहे. जातीय दंगलींच्या बाबतींत हिंदुत्ववाद्यांवर तुटून पडणारी ही मंडळी मुसलमानांच्या बाबतींत मात्र नरमाईने वागतात, बोलतात व लिहितात. मुसलमानांच्या चुकीला चूक म्हणण्याचे धाडस कोणीही करीत नाही. मुसलमानांना शांतता राखण्यासाठी आर्जवे केली जातात व हिंदूंना संयमाचे धडे दिले जातात. हा गुळमुळीतपणा आपल्या इतका अंगवळणी पडला आहे की जरा एखाद्या राजकीय नेत्याने मुसलमानांना त्यांच्या चुकांबद्दल खडसावण्याचे धाडस केलेच तर अपराधी सोडून इतर सर्वांचीच भीतीने गाळण उडते व खडसावणाऱ्या नेत्यावर कट्टर, जहाल, जातीयवादी, असे शिक्के मारण्यास सर्वजण अहमहमिकेने पुढे येतात.


अशा भयगंडाच्या पार्श्वभूमीवर घेतलेले निर्णय व केलेल्या कृती या एकतर परिणामशून्य असतात किंवा अपेक्षित परिणामांच्या उलट परिणाम करणाऱ्या  असतात. हिंदुस्थानांत भयगंडांतून निर्माण झालेल्या अतिसहिष्णु वातावरणांत राहूनही हिंदुस्थानी मुसलमानांची इतर धर्मियांविषयी असहिष्णु वृत्ति जराही कमी झाली नाही. उलट, अगदी क्षुल्लक कारणासाठीही उठाव करून जातीय तणाव निर्माण करण्याची त्यांची प्रवृत्ति वाढीस लागली आहे. (सुधारक समजले जाणारे बहुतांश मुसलमान त्याबाबतींत मतलबी मौन बाळगून आहेत). यामागे उघडपणे इस्लामी विस्तारवाद आहे. पण हे स्पष्टपणे मांडण्याचेही धाडस कुणी करीत नाही. मग त्याबद्दल कृती करणे तर दूरच.


ही परिस्थिति सुधारावयाची असेल तर भयगंडापासून आपण आपल्याला मुक्त केले पाहिजे. ही गोष्ट अशक्य नाही तर प्रयत्नसाध्य आहे. मुळांत प्रत्येक हिंदूने वैयक्तिक पातळीवर भयगंडमुक्त व्हावयास हवे. म्हणजे राज्यकर्ते व प्रसारमाध्यमे आपोआपच निर्भय होतील. कारण लोकशाही असल्यामुळे दोन्ही क्षेत्रांत येणारी माणसे लोकांमधूनच येतात.


भयगंडापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला भय वाटते हे प्रथम स्वतःशी कबूल केले पाहिजे. स्वतःच्या वास्तवतेबद्दल स्वतःला अंधारांत ठेवून फसवू नये. परिणामकारक उपचार पद्धतींतील ही पहिली पायरी आहे. त्यानंतर निष्क्रीयता झटकून कुठल्याही भयजनक प्रसंगी आपण सतत असेच घाबरून आयुष्य काढायचे की थोडसा धोका पत्करून पुढील आयुष्य कायमचे भयमुक्त होऊन जगायचे याची निवड करावी. धोका पत्करतांना ज्या प्रतिकूल परिणामांची भीति वाटते त्यांच्यासाठी पूर्वतयारी व व्यवहार्य तरतूद करून ठेवावी. आपल्या वागणुकीने आपण भीतीचा किंवा धैर्याचा वारसा पुढील पिढ्यांसाठी ठेवत असतो हे नेहमी लक्षांत ठेवावे.        


आपणास काय वाटते?