शिमला मिरची

वाढणी
२-३ व्यक्तींकरता

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • शिमला मिरची-२,कांदा-१,लसूण-आल्याची पेस्ट,१ चमचा तिखट,
  • १/२ टि‌. स्पून हळद,मीठ चवीनुसार,जीरे,मोहरी,
  • भाजलेले दाण्याचा कूट १/२ वाटी,फ़ोडणीकरता तेल

मार्गदर्शन

अशा विधानांवर खरोखर विश्वास ठेवायचा का?

राहूल महाजन संदर्भातील आपल्या अग्रलेखात मुंबई सकाळ लिहितो. "अलीकडच्या काळातील संस्कारशून्य आणि चंगळवादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तरुण पिढीचेच जणू प्रत्यंतर आले आहे". एखाद्या घटनेवरून समष्टीबद्दल असे विधान करणे कितपत योग्य वाटते. की "जणू "असा काव्यात्मक शब्द वापरून काल्पनिकच तर्क करायचे. हे तरी बरोबर का?

कावळा

कधी तरी कुठे तरी वाचलेली कथा-


आटपाट नगरात एक गरीब कष्ट्करी कुटुम्ब रहात असते. ३ मुलं आणी त्यांचे आई बाबा. आई वडील दोघेही मजुर आणी कुटुंबाचे बस्तान एका लहानग्या झोपडी मधे. एका वर्षी प्रचंड असा दुष्काळ पडतो. ते गरीब कुटुंब अन्नाला महाग होते. घरात असलेले किडुक मिडुक विकुन कसातरी आला दिवस ढकलने चालु असते. हळुहळु परिस्थिती अजुनच बिकट होते. मुले लहान असतात, त्यांचे पोट भरावे म्हणुन ते दोघे अर्धपोटी रहायला सुरुवात होते. नवरा एक दिवस रोजच्या त्रासाला कंटाळुन तिरीमिरीत घर सोडुन परगांदा होतो. आता आई कंबर कसते आणी आपल्या लहानग्यांचे कसेबसे पोट भरायला सुरुवात करते. पण दिवस अजुनच वाईट येतात. कुटुंबाची अन्नान्न दशा होते. रोजच्या उपासमारीने एकादिवशी बिचारी दगावते.

नक्की काय करायच

आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.
     - पंडीत जवाहरलाल नेहरू.


.....


माणसांने आपल्या शत्रुवरदेखिल प्रेम करावे.
      - महात्मा गांधी.


आता ह्यातील नक्की काय करायच?

एक (अस्ताव्यस्त) निरोप समारंभ

एप्रिल महिना जवळ आला होता. अभियांत्रिकीच्या (भल्याभल्यांना तोंडघशी पाडणाऱ्या) तोंडी परिक्षा तोंडावर आल्या होत्या. पण आम्ही तिसऱ्या वर्षाची मुलं(काही शिक्षक 'कार्टे' आणि 'कार्ट्या' म्हणत तो भाग सोडा!) अभ्यास, प्रात्यक्षिकं,लिखाण सर्व विसरुन एका आठवड्यावर आलेल्या एका दिवसाच्या तयारीला कंबर कसून लागलो होतो. तो दिवस म्हणजे 'फेअरवेल'. तिसऱ्या वर्षीय मुलांनी अंतिम वर्षीय मुलांना द्यायचा निरोप समारंभ.

परदेशस्थ मराठीजनांना आवाहन

जी.ए.कुलकर्णी यांच्याविषयी मी 'मनोगत' वर केलेल्या लिखाणानंतर आलेले प्रतिसाद आणि व्य. नि. यावरून हा प्रस्ताव मांडत आहे.
एकंदरीत असे दिसते की वाचकांमध्ये जी.एं. नी भारून गेलेले, 'आपण वाचल्या काही कथा पण आपल्याला काही कळाले नाही बुवा' असा अभिप्राय असणारे आणि जी.ए.

मनोगत तबकडीवर उपलब्ध

मनोगतावरचा 'तो' ५ तारखेला पुण्याहून त्याच्या गावी गेला. 'तो' दिल्ली IIT  ला होता. तेथे त्याने मनोगताची तबकडी बनवली होती. त्याची एक प्रत त्याने मला दिली आहे.


या तबकडीवर २००४ ते २००६ पर्यंतचे लेख आहेत. मनोगतावर असल्यासारखेच येथे सुद्धा वावर करता येतो. मात्र येथे एक अडचण आहे ती म्हणजे यात प्रतिसाद उघडत नाहीत. मात्र सगळे लेख उत्तम काम करताहेत. जालजोडणी असल्यासारखे पाने उघडतात.

हिंदुस्तानी संगीत ० - प्रास्ताविक

रसिकहो,
माझ्या छोट्याशा प्रस्तावाला मिळालेल्या आपल्या उत्साहवर्धक प्रतिसादांमुळे ही लेखमाला सुरु करण्याचे धारिष्टय करीत आहे. याद्वारे उत्तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा अल्प परिचय करून देण्याचा उद्देश आहे. आपले अनुकूल प्रतिसाद मिळाल्यास पुढील लेख लिहिण्यास मनोधैर्य येईल व वाढेल.
हा पहिला- नव्हे शून्यावा - लेख आहे. 
लेखापूर्वी थोडी पार्श्वभूमी
 सांगणे आवश्यक वाटते.
संगीताच्या बाबतीत सुशिक्षित होण्याचे भाग्य मला लाभले नाही, असे असूनही चांगल्या मित्रांचा सहवास व चांगले गायन ऐकायला मिळाल्यामुळे मी स्वतःला सुसंस्कृत समजतो.
परंतु अशा व्यक्तीने संगीतासारख्या अथांग विषयावर लिहिले तर त्यात अनेक त्रुटी राहून जाण्याची व चुका होण्याची शक्यता आपण कायम ध्यानात ठेवली पाहिजे.
म्हणून मी श्री. तात्या व इतर संगीततज्ज्ञ मनोगती यांच्याकडून या व पुढील लेखांत वेळोवेळी असे दोष दाखवून देण्याची व यथायोग्य सुधारणा करण्याची अपेक्षा ठेवतो आहे.
दुसरी एक गोष्ट म्हणजे लिहिताना बहुतांशी स्मरणाचा आधार आहे, कुठलेही संदर्भ पुस्तक किंवा पेटीसदृश वाद्य माझ्या हाताशी नाही (त्याशिवाय धकून जाईल असे या क्षणी तरी वाटते आहे, बघूया). काही गडबड झाल्यास आपण क्षमाशीलपणे काणाडोळा कराल ही आशा करतो. 

हे लेख कोणासाठी आहेत?
अशांसाठी की
ज्यांना शास्त्रीय संगीत ऐकायला आवडते, पण अजिबात समजत नाही;
ज्यांना स्वर, सप्तक, कोमल-तीव्र, थाट, राग, ताल, इ. हे काय असतात हे माहीत नाही व समजून घेण्याची इच्छा आहे;
ज्यांना दोन सूर ऐकले की ते एकच आहेत की वेगळे आहेत हे (साधारणपणे) कळते (*** टीप पहा).
सामुग्री कोणती हवी?
बहुतेकांकडे हार्मोनियम (जुन्या भाषेत बाजाची पेटी) किंवा कॅशिओ वा तत्सम कळपट्टीवाले वाद्य असते ते पुरेसे आहे, नसल्यास शक्यतो उसने घेऊन का होईना जवळ ठेवावे. नुसते वाचून फारसे कळायचे नाही, हॅन्डस-ऍन्ड-ईअर्स-ऑन चा फायदा अधिक. 
मुख्य म्हणजे प्रयोगशीलता व फुरसत हवी. वाचून सोडून दिल्यास (प्रशासकांचा) पैसा वसूल होणार नाही.
यातून काय मिळेल (व खरे म्हणजे काय मिळणार नाही)?
संगीताची समज वाढू शकेल. ऐकण्यातली मजा वाढू शकेल.
संगीताच्या भाषेचा परिचय होईल, पुढील ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न विचारण्यापुरती कुवत येऊ शकेल.
पण या मुदलावर तुम्ही गाण्याचे कार्यक्रम करू शकणार नाही. (वसंतराव किंवा कुमार गंधर्व यांच्याप्रमाणे) स्वतः प्रतिभावंत असल्याशिवाय गुरूकडून शिकण्याला
पर्याय नसावा. आणि उच्च पातळीवरील ज्ञान देण्याची कुवत प्रस्तुत लेखकाकडे नाही.
कुठल्याही बिंदूवर दिलेली माहिती अतीच प्राथमिक आहे असे वाटल्यास खुशाल लेख बंद करून ठेवून द्यावा.
पण न पटल्यास वा न समजल्यास लेखकाला जरूर धारेवर धरल्यावाचून राहू नका ही शेवटची विनंती.