स्पेलिंग बी

काल रात्री शालेय विद्यार्थ्यांची अमेरिकेत स्पेलिंग बी ची (स्पेलिंग स्पर्धा) अंतीम फेरी होती. हे भारतातही प्रक्षेपित होते का?


ह्यातल्या काही गंमती.
१. शेवटच्या राउंडला तिन्ही मुली होत्या.
२. भारतीय वंशाचे दोन चार मुले मुली शेवटच्या १३ जणांच्या गटात होते पण भारतीय वंशाचा चौथ्या क्रमांकावरच राहिला.
३. शब्द अर्थातच अत्यंत जड, कधीही न वाचलेले वा ऐकलेले होते. पण...
४. शेवटच्या काही राउंडमधे काही देशी शब्द विचारले. उदा. इज्जत. हा शब्द इंग्रजीत शिरला आहे हे माहीत नव्हते. विजेतीला शेवटून दुसरा शब्द चक्क कुंडलिनी हा होता. म्हणजे योग, अध्यात्माशी संबंधित. हाही शब्द इंग्रजीने घेतला आहे हे माहीत नव्हते.
५. एका स्पर्धक (तेलगू भाषिक) मुलाची आई चक्क साडी नेसून आली होती.  हे पाहून बरे वाटले. कॅमेरा स्पर्धकांच्या पालकांवरही रोखला जात होता. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव टिपायला.

एकंदर शब्द बघितल्यावर असे वाटते की ह्या स्पर्धेच्या तयारीकरता इंग्रजीखेरीज ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन, संस्कृत ह्या सगळ्या भाषांची तोंडओळख करुन घ्यावी लागत असेल.

कोरफ़ड पाक

वाढणी

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • मोठया(जाड) कोरफ़डीचे एक पान
  • मध ४ चमचे
  • काजु आणि इतर सुका मेवा २ चमचे
  • वेलदोडे २
  • जायफ़ळ चिमुट्भर
  • केशर ४-५ काड्या

मार्गदर्शन

कोरफडीच्या पानाला चाकूने उभा काप देणे,जेणेकरून दोन भाग होतील.

मधील गराला चाकूने २-२ बोटाच्या अंतराने आडवे काप देणे. चमच्याने गर सालींपासून अलगद वेगळे करुन मोठ्या वाटीत काढणे. त्यात वरील इतर साहित्य टाकून मिसळणे. वाटीत खायला देणे.जेली सारखा हा पाक चवीला छान लागतो.

 

राहुल महाजनवर विष-प्रयोग

प्रमोद महाजनांच्या मृत्युनंतर आता राहुल महाजन ह्यांच्यावर विष प्रयोग झाला आहे. महाजनांच्या मृत्युमागेदेखील भाऊबंदकीपेक्षा काही वेगळे हेतू तर नसावे? कदाचित प्रवीण महाजनचा उपयोग करून दुसऱ्याच कुणीतरी आपले इप्सित साध्य केले असू शकते. महाजनांच्या पत्नीला निवडणूकीचे तिकीट मिळते आहे आणि राहुलदेखील भाजपात सक्रीय होणार होता, ह्या पार्श्वभूमीवर हा विषप्रयोग राजकीय शत्रुत्वातून झाला आहे की काय असे वाटायला लागले आहे.

आजचे मराठी संगीत

           मनोगताचे रूप बदलल्यापासून पहिल्या पानावर दिसणारे लेखन आपोआप वाचले जाते. तसाच तात्यांचा थोडासा जुना 'प्रिय बाबूजी' हा लेख आणि (अर्थातच) त्यावरचे प्रतिसाद वाचनात आले. आणि मग त्याची पार्श्वभूमी म्हणून 'हिमेश रेशमिया' ही चर्चा वाचली. त्यातले जुन्या आणि नव्याचे वादविवाद वाचले आणि हा महत्वाचा प्रश्न उभा राहिला.
         हिंदी गाण्यांचे काहीही असूदे. पण मराठी गाण्यांचे काय? आज नवी मराठी गाणी कुठे आहेत? मराठी चित्रपट संगीत ज्याला एकेकाळी सोनेरी दिवस होते ते आज कुठे आहे?  आज आपल्यापैकी कितीजण 'नवीन' मराठी गाण्यांच्या ध्वनिफीती विकत घेतात? मराठी चित्रपट आता कात टाकतोय. तसाच प्रयोग चित्रपट संगीतातही होतोय का? 'उत्तरायण' सारख्या चित्रपटातील गाणी कोणी ऐकली आहेत का? सलील, अभिराम ही मंडळी कोण आहेत? अशी मंडळी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कमी का आहेत? मराठी गैरफिल्मी संगीतात काय चालले आहे? हे आणि असे अनेक प्रश्न.
          जुने मराठी संगीत हे निर्विवाद अभिजात आणि अजरामर आहे. पण नावीन्य ही काळाची गरज आहे.  जुन्या गाण्यांच्या बरोबर नव्यामधले जे चांगले आहे त्याची ही प्रशंसा आणि प्रोत्साहन गरजेचे आहे. नाहीतर हिंदी गाण्यांच्या लाटेत नवी मराठी गाणी तग धरू शकणार नाहीत.
          या चर्चेत आपण वरील प्रश्नांची उत्तरे, त्यातून निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तर करूच. पण नव्या संगीताला वाव आणि प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल हे ही पाहू.  मला वाटते, या मराठमोळ्या संकेतस्थळावर हिमेश रेशमिया पेक्षा अशा चर्चा जास्त उपयोगी ठरतील.

नागपूर पोलिसांचे अभिनंदन.

अतिरेक्यांचा कट उधळून लावणाऱ्या, स्वतःच्या जीविताची पर्वा न करता अतिरेक्यांच्या गोळ्या अंगावर झेलणाऱ्या नागपूर पोलिसांचे अभिनंदन.
पोलिसांच्या दक्षते मुळे खूप मोठा अनर्थ टळला.


जय हिंद,जय महाराष्ट्र.

कोडे - मेंढ्या पार करा

खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे एकूण ६ मेंढ्या आहेत.


१. लाल मेंढ्या उजव्या बाजुला न्यायच्या आणि निळ्या मेंढ्या डाव्या बाजुला.


२. प्रत्येक मेंढी दुसऱ्या गटातील मेंढीवरून उडी मारून पुढच्या खडकावर जाईल. एक मेंढी केवळ दुसऱ्या गटातील एकाच मेंढीवरून उडी मारू शकते.

शक्ती

असे म्हणतात की कोणे एके काळी मानवाकडे दैवी शक्ती होत्या...


मानवाने त्यांचा दुरूपयोग केला.


सृष्टीकर्त्या ब्रम्हदेवांना राग आला.


मानवाकडून त्या शक्ती हिरावून घेऊन कुठेतरी लपवायचं त्यांनी ठरवलं.


देवांची सभा भरली.


कुणी म्हटल, "आपण त्या शक्ती पाताळात गाडल्या म्हणजे कोणालहि कळणार नाही.