नागफणी (ड्यूक्स नोज)

मुंबई पुण्याच्या सर्वांनाच खंडाळ्याच्या घाटाचे आकर्षण असते. पावसाळ्यात तर  कर्जत लोणावळा हा प्रवास गाडीच्या दारातच बसूनच करायचा आणि आजूबाजूच्या डोंगरदऱ्या, धबधबे डोळयात भरून घ्यायचे हे ठरलेले असायचे.


कर्जतहून (वा खोपोलीहून रस्त्याने) खंडाळ्याकडे वर येतांना उजव्या हाताला नागाच्या फणीच्या आकाराचा एक सुळका आकाशात घुसलेला दिसतो. त्यालाच बिलगुन तसाच एक थोडा छोटा सुळका दिसतो. हाच तो सुप्रसिद्ध नागफणी व धाकली नागफणी (ड्यूकस व डचेस नोज). या बाजूने बघतांना इथे अत्यंत अवघड श्रेणीचे व उंच असे प्रस्तरारोहण केल्याशिवाय जाणे शक्य नाही असेच वाटते. तशा काही मोहिमाही झाल्या आहेत आणि त्या दरम्यान काही मृत्यूही ओढवले आहेत.

नऊ ते पाच - १

गजराच्या घड्याळाचा गजर कसा वाज़तो, हे ऐकायची कधी पाळी न आल्याने (गरज़च न पडल्याने) 'गजर झाल्यावर झोपेतून उठणे' या प्रकाराशी माझा आज़तागायत संबंध नव्हता. माझ्यासाठी "अरे मेल्या, ऊठ आता. साडेआठ वाज़ले. ऐद्यासारखं खायचं आणि लोळायचं, बास्! बाकी काही नाही", अशी आईने चालू केलेली आरती हाच खरा गजर. झालंच तर या मुख्य आरतीला ज़ोडूनच, "कामात काडीची मदत नाही","अभ्यासाच्या नावानेही शून्य", इत्यादी आरत्या गाऊन झाल्यावर, अगदीच निरुपाय झाला, की "चिटणिसांचा गुण लागलाय, दुसरं काही नाही", अशी मंत्रपुष्पांजली! पूर्वजांवरच (आणि त्यांच्या कर्तृत्त्वावरच!)असे खळबळजनक आरोप झाले, की नंतर मात्र प्रसाद वाटायला बाबा हज़र!!! मग तो प्रसाद भक्षण करून अस्मादिकांची स्वारी बिछान्यातून बेसिनवर. गॅलरीत तोंडात ब्रश धरून पुढची उरलीसुरली झोप काढायची (म्हणजे तसा प्रयत्न करायचा) आणि काकडआरती सुरू झाल्यावर दूध, अंघोळीसाठी पुन्हा घरात पाऊल टाकायचे हा दिनक्रम. पण इकडे यायच्या दिवशी विमानतळावर "अमेरिकेत कसा रे उठणार तू स्वतःचा स्वतः आणि कसं सगळं वेळेवर आवरणार भराभ्भर!" या वाक्यातली आईच्या जिवाची तगमग, ती दिनचर्या अंगवळणी पडलेल्या माझ्यासारख्या(निगरगट्टा)लाही क्षणभर भावूक (!) करून गेली ः(

जगाच्या राजधानीतून - शेवट

आणखी खूप वेळ तिथल्या सदैव ताज्या वाटणाऱ्या पिवळ्यापोपटी हिरवळीवर बसून मूर्तिचिंतन करण्याचा विचार होता, पण एका सुरक्षा रक्षकाने सायंकाळी पाच वाज़ता नम्रपणे 'आता घरी ज़ाण्याची वेळ झाली' असे सांगितले (दंडुका आपटत 'चलो चलो चलो' केले नाही, त्यामुळे थोडे चुकचुकल्यासारखे झाले खरे!) त्यामुळे पुन्हा बेटावरील धक्क्याकडे पावले वळली. 'मिस न्यू जर्सी'चा कॅटवॉक पुन्हा अनुभवायचा होता ः)

सहा-सहा-सहा

मंडळी,
उद्याची तारीख बघितलीत का?
सहा जून २००६, संक्षिप्त लिहिली तर ६-६-६ होते.

तर या कट्ट्यावर सहा या संख्येची महती सांगणारी माहिती, वाक्प्रचार, म्हणी, कविता, श्लोक, सुविचार, घटना, किंवा अजून असे बरेच काही लिहूयात.


साधारण १३

संत्र्याच्या पाच बिया! (२)

"काका, हे सगळं काय चाललंय?" मी त्याला  ओरडून  विचारलं

"मृत्यू" तो म्हणाला आणि त्याच क्षणी त्याच्या खोलीत गडप झाला. हा सगळा प्रकार पाहून मला भितीने अगदी घाम फुटला. मी ते पाकीट उचललं. त्याच्या आतल्या बाजूला डिंकाच्या वर लाल शाईने 'K' हे अक्षर तीन वेळा लिहिलेलं होतं. त्या पाच संत्र्याच्या बिया सोडल्या तर त्या पाकिटात दुसरं काहीही नव्हतं. तो इतका का घाबरला होता हे काही केल्या माझ्या लक्षात येईना. मी त्याच्या खोलीकडे पळालो. तो मला वाटेतच भेटला. त्याच्या हातात एक जुनाट गंजकी किल्ली - माळ्यावरच्या खोलीची असणार ती ,  होती आणि दुसऱ्या हातात एक गल्ला जमा करायला वापरतात तसली पितळी पेटी होती.   

जी.एं. च्या कथांमधील नियतीवाद

चित्रकार सुभाष अवचट हे जी.एं. चे (त्यातल्या त्यात ) मित्र. त्यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण जी.एं. ना पाठवले. जी.ए. लग्नाला उपस्थित रहाण्याचा प्रश्नच नव्हता. जी.एं. नी अवचटांना जे उत्तर पाठवले त्यात म्हटले आहे
'आयुष्यात अनेकदा तडजोडी निर्विकारपणे कराव्या लागतातच, व माणसाचे मर्यादित सामर्थ्य ध्यानात घेता आपण फारशी तक्रार करू नये. पण या तडजोडी जेथे आंतडे गुंतलेले नाही अशा बाबतीत घडल्यास त्याचे सोयरसुतकही फारसे नसते. पण प्रत्येक इमानदार व्यक्तीच्या जीवनात एक लहानमोठा कोपरा असा असतो की त्याठिकाणी तो तडजोडीच्या मळकट, ओबडधोबड पावलांना प्रवेश देऊ इच्छीत नाही - निदान त्यानी येऊ नये म्हणून त्याची अविरत धडपड असते. जी व्यक्ती हे इमान शेवटपर्यंत अनाघ्रात ठेवू शकते, तिला ( मग तिचे लौकिक यश काहीही असो ) मी अत्यंत भाग्यवान समजतो. याचे एक कारण म्हणजे अशा या जिव्हाळ्याच्या जागी तडजोड असहायपणे करावी लागली की सारे आयुष्यच शरमेने कळकून गेल्यासारखे होते. (नंतर ही शरमदेखील हळूहळू नाहीशी होऊन मन निबर होऊन बसते ही माणसाची खरी शोकांतिका)'
जी.एं. च्या लिखाणात सगळीकडे दिसून येणाऱ्या नियतीशरणतेचेच हे उदाहरण आहे. जी.एं. च्या कथांतील माणसे दुःखाने, वेदनेने, दारिद्र्याने पिचलेली, हतबल, असहाय झालेली असतात. नियती नावाच्या अदृष्य शक्तीच्या फटकाऱ्याने मोडून पडलेली असतात. जेथे प्रयत्न आणि आशा संपून जाते अशा ओलसर, अंधाऱ्या कोपऱ्यात कशीबशी जगत मरणाची वाट पहात पडलेली असतात. हाडेकातडी टाकायला एक हक्काची जागा, दोन वेळचे गोळाभर अन्न आणि कुणाचातरी मायेचा एखादा शब्द अशा माफक अपेक्षाही ती नियती नावाची चेटकीण पूर्ण होऊ देत नाही आणि माणसाचे आयुष्यच दुःखाने गच्च गच्च होऊन जाते.
जी.एं. च्या टीकाकारांनी याला जी.एं. चा एकसुरीपणा, निराशावाद, क्वचित पलायनवादही म्हटले आहे. पण जी.एं. चे लिखाण वाचताना तसे वाटत नाही. 'सगळी सुखी माणसे एकाच पद्धतीने सुखी असतात, पण प्रत्येक दुःखी माणसाच्या दुःखाचे तऱ्हा वेगळी असते' या अर्थाचे टॉलस्टॉयचे वाक्य जी.एं. नी 'रक्तचंदन' या कथासंग्रहाच्या पहिल्या पानावर लिहिले आहे. जी.एं. च्या कथांमधील व्यक्ती दुःखाच्या अशाच वेगवेगळ्या जात्यांखाली भरडल्या गेल्या आहेत. संसार उद्वस्त झालेल्या सण्ण्याच्या आयुष्यात वरून धुळीत नाणे पडावे तसे आलेले, केवड्यासारख्या अंगाचे आणि शिंपल्यासारख्या पायाचे कबूतर पैजेच्या इर्षेत शिकारी ससाण्याचा घास होते (चंद्रावळ), आपले जीर्ण, म्हातारे, नकोसे झालेले आयुष्य रेटणाऱ्या भाऊन्च्या आंधळ्या डोळ्यांआड त्यांची हसरी, सोनकेळीसारखी नात अचानक निवर्तते (राणी), लंगड्या गोविंदाचार्याची उठवळ बायको त्याच्या पदरात काळे, वातीसारखे अशक्त पोर टाकून कुणा गणागणपाचा हात धरून निलाजरेपणाने निघून जाते आणि ते पोरही बघताबघता पोट फुगून मरून जाते ( अवशेष),  सगळे आयुष्य शिक्षकी आदर्शात काढलेल्या नाडगौडा मास्तरांचा तरणाताठा मुलगा परीक्षेत तिसऱ्यांदा नापास होण्याच्या भीतीने विहीरीत जीव देतो (सांगाडा), नरसूभटाच्या पहिल्या बायकोप्रमाणेच दुसरी बायको कावेरीही मेस्त्रीच्या उग्र, रानवट हातून कुस्करली जाते (काकणे), आयुष्यभर कुरूप, हाडकुळे, सरड्यासारखे पाय घेऊन, बापाच्या तुच्छतेचे वळ झेलणाऱ्या काशीची बापाच्या मृत्यूनंतर सुटका होते तोच नामूच्या विखारी वासनेची काळी अभद्र सावली तिच्यावर पडते ( शलॉट), कंजूषपणे पै पै करून जगलेल्या गोविंदरावांच्या एकुलत्या एका बापूला वेड लागते आणि गोनिंदरावांचे सगळे आयुष्यच दरिद्री, भिकारडे होऊन जाते (जखम), मानेवर कोड असलेल्या मेधाला फसवून कंटाळवाण्या रूपवान लिलूशी लग्न करणाऱ्या माधवला मेधाची आई निरोप घेण्याआधी सगळेच गुपीत उघडे करून सांगते आणि मग माधवचे अस्तित्वच जणू शरमेने बुळबुळीत होऊन बसते (रातराणी), गैरसमजातून आपल्या जन्मदात्या आईविषयी मनात फक्त विषारी तिढे घालत बसलेल्या रुक्मिणीचा शेवटी नियतीकडून पराभवच होतो (पराभव), आपल्या हाताला जणू कातडीप्रमाणे चिकटलेले अपयश सोडवण्याच्या डॉक्टर दादा पाठकांची सुटका शेवटी मृत्यूच करतो (सोडवण), वाईट नजरेची म्हणून समाजाने वाळीत टाकलेली राधी शेवटी तिने माया लावलेले कुत्र्याचे पिलू चावून तडफडून मरते ( राधी), आयुष्यभर घरगुती गिऱ्हाइकांना खमंग, झणझणीत मसाला भजी, चरचरीत उसळ आणि जाड, कापडाच्या पट्टीसारखा चहा देणाऱ्या गावठी सदूभाऊंचे त्यांचा मुलगा ताब्यात घेतो आणि त्याच्या धंद्याच्या नवीन गणितात कुठेच जागा नसलेले सदूभाऊ आणि सीताबाई अगदी बेवारस, पोरके होऊन जातात ( माघारा), वांझोटी म्हणून जगाकडून हिणवून घेणारी करेव्वा एका आगळ्या तिरीमिरीत अंधाऱ्या रात्री गावाबाहेरच्या रानमारूतीसमोर नवस बोलायला जाते, पण तिच्या हाती अपेक्षाभंगासोबतच येते ते एक भयाण जळते सत्य (वंश)......
जी.एं. च्या पात्रांची दुःखे अशी बहुपेडी, सर्वस्पर्शी आहेत.  मानवी भावभावना, विकार, वासना यांचे इतके जिवंत चित्रण करणारा दुसरा साहित्यिक माझ्या तरी वाचनात नाही. एक मात्र खरे, जी.ए. हा केवळ मनोरंजन म्हणून वाचण्याचा लेखक नव्हे. दुपारच्यी झोपेपूर्वी डोळ्यासमोर धरायला चार अक्षरे पाहिजे असतील तर त्यांनी जी.एं. च्या वाट्याला न गेलेले बरे.
जी.एं. च्या व्यक्तीरेखांना अस्सल खानदानी मराठमोळी पार्श्वभूमी आहे. त्यांच्या पात्रांची भाषा, त्यांवरचे संस्कार,  परंपरागत, क्वचित जुनाट आहेत. त्यांच्या मराठीवर कानडीची एक गोड झाक आहे. जी.एं. नी भाषेला तर गारूडी नागाला जसा डोलावतो तसे डोलायला लावले आहे. त्यांच्या प्रतिमा, भाषेवरची त्यांची हुकुमत थक्क करून टाकणारी आहे. सर्पप्रतिमा ही जी.एं. च्या आवडत्या प्रतिमांपैकी एक. जयवंत दळवींच्या लिखाणात जसे वारंवार वेड्यांचे उल्लेख येतात तसे जी.एं.च्या  लिखाणात सापांचे. आणि हे इतके जिवंत की जणू डोळ्यासमोर ते साप सळसळत जातात. उदाहरणच द्यायचे झाले तर दानय्या गारूड्याचे चित्रण करणाऱ्या 'तळपट' या कथेतले हे वर्णन पहाः
'दानय्याचे पावले थांबली. त्याच्यावर पुटाप्रमाणे चढलेली वर्षे गळून पडली. सारे अंग इशारा दिल्याप्रमाणे खडबडून जागे झाले अणि एक पीळ होऊन प्रसंगासाठी तयार झाले. अंग असे खबरदार झाले, हातावर असा हलकाच फुलोरा झरझरून गेला की जवळच कुठे तरी नाग आहे हे त्याला जाणवे. थोड्याच वेळात दगडांच्या ढिगाऱ्यात त्याला धगधगीत केशरी रंगाचा एक वळसा दिसला. तो वळसा पिंढरीएवढा जाड होता व त्यावर खवल्यांची उग्र कुसर होती'
जी.एं. चे शब्दसामर्थ्य हे असे दिपवून टाकणारे आहे. ही दैवदत्त देणगी तर खरीच, पण त्याबरोबर जी.एं. चा शब्दांचा आणि भाषेचा सखोल व्यासंग हेही त्यामागचे एक कारण आहे. पण त्याविषयी पुन्हा कधीतरी...