खमंग फूलकोबी

वाढणी
खाणाऱ्यांच्या भुकेवर

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • २-३ मध्यम आकाराच्या ताज्या फुलकोबी(फ्लॉवर)
  • चाट मसाला
  • तिखट
  • मीठ
  • चंदेरी कागद(ऍल्युमिनीयम फॉइल)
  • माती(उपलब्ध असल्यास)
  • शेकोटी(उपलब्ध असल्यास),नसल्यास तेल व कढई चालेल.
  • कढईत करायचा बेत असल्यास ३ मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर

मार्गदर्शन

भेट

आधी काही कारणाने घेईन घेईन म्हणता म्हणता घ्यायच्या राहून गेलेल्या भेटवस्तू विकत घ्यायला मी क्रिसमसच्या आदल्या दिवशी सुपर मार्केटमध्ये गेले. तिथल्या तौबा गर्दीला बघता माझी स्वतःशीच कुरकुर सुरू झाली,"आता इथेच जाणार सगळा वेळ..

उकडीचे मोदक

वाढणी
४ जणांसाठी (१२ ते १५ नग )

पाककृतीला लागणारा वेळ
60

जिन्नस

  • पारीकरता - १/४ किलो बासमती तांदुळाची पिठी ( साधारण १ मोठे भांडे (शिगेस) भरुन )
  • पीठाएवढेच पाणी
  • १ मोठा चमचा लोणी / तेल , चवीपुरते मीठ
  • सारणाकरता - २ नारळांचा चव (खोबरे) (अंदाजे ३ वाट्या)
  • गुळ अंदाजे २ वाट्या (गोडाच्या आवडीप्रमाणे कमीजास्त चालेल)
  • आवडीप्रमाणे वेलदोड्याची पूड

मार्गदर्शन

शुभ्र गालिचा

जेमिमा आणि खुर्शिद पश्चिम अफगाणमधील 'हेरात' नामक एका छोट्या शहरात आनंदाने संसार करत होते. खुर्शिदचे एक छोटेसे दुकान होते ज्यात तो गालिचे विणून विकायचा. एका महिन्यात तो जेमतेम १०-१५ गालिचेच विणू शकायचा. घरकामातून उरलेल्या वेळात जेमिमादेखील त्याला त्याच्या कामात मदत करायची. त्यांचं उत्पन्न हे फक्त त्यांचा व त्यांची मुले झाकीर व आलम यांच्या जेवणाखाणाचा प्रश्न सुटू शकेल इतपतंच होतं, पण प्राप्त परिस्थितीबद्दल त्यांची कूरकूर अशी अजिबात नव्हती. खुर्शिद जेमिमाला दरवर्षी म्हणायचा की,"माझ्याकडे जेव्हा थोडे पैसे उरतील, तेव्हा मी तुला नविन साडी घेऊन देईन." पण वर्षानुवर्षं जेमिमा हे नुसतंच ऐकत होती ! प्रत्येक वेळेस ती त्याच्याकडे बघून मंद हास्य करायची आणि विणकाम चालू ठेवायची. तिला त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे माहित असल्याने ती त्याला समजून घ्यायची. मुलांना एका छोट्या शाळेत घालणेच त्याने कसेबसे जमवले होते, हे ती जाणून होती.

सगळं सुरळीतपणे चाललेलं होतं जोवर अमेरीकी हल्ल्याची बातमी आली नव्हती. शहरात सगळीकडे या बातमीवर मतमतांतरे जोर धरत होती.

त्यादिवशी रमहतुल्लाह खुर्शिदच्या दुकानात आला. रहमत म्हणजे खुर्शिदचा जिगरी दोस्त.

"का रे, तू बातमी ऐकलीस का?" रहमत.

खुर्शिदला या बातमीने काहीच फरक पडलेला नव्हता जणू. "ह्म्म.. अरे हा माझा नविन गालिचा बघ. आजवर मी बनवलेल्या सर्व गालिचांमध्ये हा सर्वात उत्तम विणला गेलेला आहे."

तो एक पांढऱ्याशुभ्र रंगाचा गालिचा होता ज्यावर अप्रतिम रंगसंगती साधून ताजमहाल विणलेला होता.

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#१४)

                      ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग १४.


नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी
रामकृष्ण वाचा अनंत  राशी तप । पापांचे कळप पळती पुढे ॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान
पाठभेदः सत्यामित= सत्यमित; पाहे दृष्टीं= नातळती,नाकळती; वाचा=उच्चार; पळती=जळती; निजस्थान=निज स्थान

मराठी शब्द हवे आहेत-६

मराठी शब्द हवे आहेत -५ वरून पुढे चालू..........


इंग्रजी, किंवा अन्य कुठल्याही भाषेतील शब्दांसाठी योग्य मराठी शब्द शोधण्यासाठी, शब्द नसले तर तयार करण्यासाठी हा धागा वापरावा. तसेच 'आत्ता जीभेवर होता' असे म्हणता म्हणता हरवलेला शब्द शोधायलाही वापरता येईल.
० प्रश्न विचारताना त्या शब्दाचा आपल्याला अपेक्षित असलेला अर्थ सांगावा; जमल्यास एखादे उदाहरण द्यावे.
० उत्तर देतानाही, शक्य झाल्यास शब्दाचा वाक्यात उपयोग करून द्यावा.

पायोनिअर असंगती

पायोनिअर असंगती


२ मार्च १९७२ रोजी पायोनिअर-१० आणि ४ डिसेंबर १९७३ रोजी पायोनिअर-११ ही अवकाशयाने अंतरीक्षात झेपावली. बाह्य (पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेच्या सापेक्ष बाह्य) सौरमालेमध्ये संचार करणारी ही पहिलीच याने. सौरमालेतील बाह्यग्रहांचा [क] (outer planets) अभ्यास केल्यावर आता ही अवकाशयाने सौरमालेला रामराम ठोकून विश्वामध्ये अनंताच्या प्रवासाला निघाली आहेत. पायोनिअर-१० ही तर सौरमाला सोडून बाहेर जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू. मात्र जाताजाता ही अवकाशयाने शास्त्रज्ञांना एक कोडे घालून गेली आहेत. हे कोडे सोडविण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ जोमाने कामाला लागले आहेत. कदाचित नव्या भौतिकशास्त्राला जन्म देण्याची क्षमता बाळगणारे हे कोडे आहे तरी काय? ह्या कोड्याचे नाव आहे 'पायोनिअर असंगती', अर्थात Pioneer Anomaly.