हे कसले अनुयायी?

ही बातमी वाचा. या प्रसंगावरून काही मुद्दे मनात येतात.


१. विमानातून जायचे तर विमानप्रवासाचे नियम सर्वांना समान आहेत ना? मग जर चांदीचा धर्मदंड नेण्यास मनाई केली गेली तर चुकले कुठे?


२. शिवसेनेचा या प्रकाराशी काय संबंध? त्यांनी औरंगाबादेत नुकसान करण्याचे कारण काय? कुठल्याही विध्वंसक कार्यात शिवसेना आघाडीवर का असते?

जिकडे तिकडे लख् लख् लख्

जिकडे तिकडे लख् लख् लख्


वीज कडाडते म्हणजे नक्की कोणत्या प्रक्रिया कोणत्या क्रमाने घडतात ते ह्या भागात पाहू. निमिषार्धात चमकणारी विद्युल्लता नक्की कशी घडते हे वाचण्यासाठी मात्र काही मिनिटे लागतील! ह्या लेखांकाची लांबी इतर लेखांकांच्या तुलनेत जास्त आहे, त्याबद्दल क्षमस्व.

वीज चमकली चक् चक् चक्

वीज चमकली चक् चक् चक्


गर्जनाकारी ढगांमध्ये चमकणारी विद्युल्लता हा वातावरणीय विजेचा सामान्यतः आढळणारा आविष्कार असला तरी धुळीचे वादळ, हिमवादळ, ज्वालामुखीचा उद्रेक आणि अण्विक विस्फोट ह्या घटनांदरम्यानही विद्युल्लता निर्माण होऊ शकते. मात्र येथे आपण केवळ गर्जनाकारी मेघांमुळे निर्माण होणाऱ्या पावसाळी वादळातील विद्युल्लतेविषयी पाहणार आहोत.

वारा सुटला सू सू सूऽम

वारा सुटला सू सू सूऽम


आकाशात चमकणाऱ्या विजेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आधी ही विद्युल्लता निर्मिणाऱ्या पावसाळी गर्जनाकारी मेघाच्या (Thundercloud) रचनेबद्दल थोडे जाणून घेणे आवश्यक ठरते. आकृती १ मध्ये दाखविल्याप्रमाणे गर्जनाकारी मेघाची सर्वसाधारण रचना असते. जलाभारामुळे पावसाळी मेघ भूपृष्ठापासून फार उंचीवर नसतात. भूपृष्ठापासून साधारण २ ते १२ किलोमीटर दरम्यान हे ढग पसरलेले असतात. हे ढग तयार होण्यासाठी अस्थीर (atmospheric instability) वातावरणामध्ये बाष्प आणि प्रबळ ऊर्ध्वगामी वाऱ्याची (strong convective wind) उपस्थिती आवश्यक असते. ऊर्ध्वगामी वाऱ्याबरोबर वरच्या दिशेने प्रवास करणारी ऊबदार आणि दमट हवा प्रसरण पावून थंड झाल्यामुळे हवेतील बाष्प गोठून (condensation) ढग तयार होतात. प्रबळ ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे ढगांत बाष्प गोठून तयार झालेले असंख्य जलकण खाली न पडता ढगात तरंगत (suspended) राहतात. ढग बाष्पसंपृक्त (moisture saturated) झाल्यावर हे जलकण पावसाच्या थेंबांच्या स्वरूपात खाली पडतात.

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! (अभंग#११)

 

                          ॥ श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥

अभंग # ११.
हरि उच्चारणी अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥
तृण अग्निमेळें समरस झाले । तैसे नामे केले जपतां हरि ॥
हरि उच्चारण मंत्र हा अगाध । पळे भूतबाधा भेणें याचे
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥

गगन भरारी - (५-शेवट!)

मेजरला रडार जॅमरचा क्रमांक बंगळूरहून आलेल्या यादीतून शोधून काढायला फारसे श्रम पडलेच नाहीत. गगनचे निकामी झालेले पार्ट्स योग्य ती कागदपत्रे तयार करून झाल्यावर सुरक्षितपणे बंगळूरला पाठवली जात. हा जॅमर निकामी झालेला होता, परंतू बंगळूरला पाठवण्याच्या आतच त्याला पंख फुटले होते......  मेजरने सर्वच अधिकाऱ्यांचे फ्लाइंग रेकॉर्ड्स मागवून घेतले होते. तेच तो वाचत होता.

गगन भरारी- (४)

भजनला अशा ठिकाणी न्यावे लागणार होते जेथे तो सुरक्षित राहू शकला असता. कुमार किंवा अमर त्याला मदत करतील हा विश्वास मेजरला होता. पण त्यांच्या पेक्षा त्याला भोसले साहेबांचा आधार जास्त वाटत होता. शेवटी ह्याला आधी भोसले साहेबांकडे न्यावा ह्या विचाराने मेजरने त्याला जीप मध्ये बसवून जीप सुरू केली.
जीप शंभर मिटर पुढे जाते न जाते तोच समोरून कुमार त्याच्या कारने येताना मेजरने पाहिले. कुमारला कच्च्या तुरुंगाजवळ येत असताना पाहून मेजरला आश्चर्य वाटले.
"कुमार ? तू कसा इथे ?"
"मला वाटलेच होते की आपण ह्यालाच बघायला आला असाल, पण आता कुठे निघालात ? ह्याचे काम झाले का ?" कुमारने भजनसिंग बाबत विचारणा केली.
"नाही, ह्याला जरा फिरवून आणतो बरोबर... काही प्रश्न विचारायचे आहेत ते जरा एकांतात विचारलेले बरे !" मेजर सीक्रेट सर्व्हिसेसमध्ये पक्का मुरलेला अधिकारी होता. मेजरने भजन ला सरळ भोसले साहेबांच्या बंगल्यावर न नेता थोडे फिरवून नेले. त्याला बघायचे होते कोणी त्याचा पाठलाग तर करीत नाही. पण त्याची शंका खोटी ठरली.

गगन भरारी- (३)

स्वत:च्या विचारांत असलेल्या मेजरच्या मागून येऊन कोणीतरी त्याच्या खांद्यावर थाप मारली."पुरी साहेबांशी गुफ्तगू झाले का ?"
"ओह, कुमार...काय चाललंय ?" "काही नाही सर, नेहमीचेच रुटीन"
"कुमार त्या दाराच्या चाव्या कोणाकडे असतात ?" "कुठल्या ?" कुमार गोंधळला होता
"रेकॉर्ड रूमच्या ?" मेजरने त्याच्याकडे रोखून बघत विचारले.
"ते दार नेहमीच उघडे असते !" कुमारने पटकन उत्तर दिले. "फनी" मेजर स्वत:शीच बोलला.
"नॉट एक्सॅक्टली.... कारण तेथे काही महत्त्वाचे नाहीच ! "
"तरीही ते बंद राहावे असे नाही वाटत तुला ?"
"नाही कारण पूर्ण कार्यालयाला मध्यवर्ती सुरक्षा दिलेली आहेच, तेंव्हा त्या खोलीला वेगळी सुरक्षा का द्यावी?"
मेजरचे तरीही समाधान झालेले नव्हते परंतू त्याने वरवर तसे दाखवले नाही.
पुढचे दोन अडीच तास सुरक्षा कर्मचाऱ्यांचा जबाब घेण्यात गेला. एव्हिएम साहेबांना भेटावे म्हणून तो त्यांच्या खोलीकडे गेला. परवानगी मागून आत गेल्यावर साहेबांनी त्याला बसायला सांगितले.

गगन भरारी- (२)

दुपार सरली व वामकुक्षी घेऊन उठलेल्या भोसलेंना दिल्लीहून एक अधिकारी आल्याचा संदेश मिळाला. मेजर दिपक भावे - सडपातळ, कुशाग्र व गोरासा पोरकट वाटणारा अधिकारी बघून भोसलेंना नवल वाटले. सीक्रेट सर्व्हिसेस मधील अधिकारी बहुतांश सेनादलाचेच असतात हा समज त्या पोरसवदा माणसाकडे पाहून खरा वाटत नव्हता. सेनादलाच्या जिप्सीला टेकून उभा असलेला मेजरने एम्बॅसेडर मधून आलेल्या एव्हिएम साहेबांना ओळखले व सरळ त्यांच्या खोलीत त्यांच्या मागोमाग शिरला.