खरं तर हे पाहून आम्ही हिरमुसलो. पण यावेळी आमच्या मदतीला अल्बर्ट आला.
हा अल्बर्ट अचानक कुठुनसा आला आणि म्हणाला, "किरण त्यांचा स्रोत स्थिर वा अस्थिर असतानाच ठराविक वेगाने प्रवास करतात असं नाही तर तुम्ही स्थिर असा किंवा अस्थिर, किरण ठराविक वेगानंच प्रवास करताना दिसतील." वरकरणी ही फार मोठी गोष्ट वाटणार नाही, पण थांबा. याचा अर्थ असा की तुम्ही कितीही वेगानं किंवा हळू जा, प्रकाश किरण तुमच्या दृष्टीने त्यांच्या नियमित ठराविक वेगानंच जातील.