केसांचे चाप

मी सात वर्षांची असताना एकदा मी आईने तिच्या मैत्रिणीला दुसऱ्या दिवशी तिचा तिसावा वाढदिवस असल्याचे सांगताना सहजच ऐकले. ते ऐकून मला दोन गोष्टी जाणवल्या – १) माझ्या आईचा पण वाढदिवस असू शकतो हे मला पूर्वी कधीच कळले नव्हते २) मी तिला कधीही वाढदिवसाची भेट स्वीकारताना पाहिले नव्हते.

मी नक्कीच ह्या बाबत काहीतरी करू शकत होते. मी माझ्या खोलीत गेले आणि माझी पेटी उघडली. त्यातले सगळे पैसे काढले. ते तब्बल पाच रुपये होते, माझी पाच आठवड्यांची कमाई.

उशीर

    जकाल स्वत:साठी वेळ काढणं तिच्यासाठी जरा मुश्कीलच झालं होतं. काही दिवसांपूर्वीच प्रमोशन झालेलं त्यामुळे ऑफिसमध्ये कामाचा भार सुद्धा खूप वाढला होता. घरी आल्यावर घरातली कामं, आई बाबांचं आजारपण, ह्या गोष्टी सांभाळण्यातच सगळा वेळ जायचा. शनिवार रविवार सुट्टी असली तरी ते दोन दिवस आठवड्याभरातून राहिलेल्या कामांमध्ये कधी निघून जायचे तेच समजायचं नाही. स्वत:चे छंद, आवडी निवडी यांचा तर तिला जवळपास विसरच पडला होता. क्वचित एखादे पुस्तक असायचं सोबतीला. तितकाच काय तो विरंगुळा.