संपादकांचा निरोप अगदी सकाळी सकाळी आला. नीलेश केबिनमधे शिरला तेव्हा संपादक जरा गडबडीत होते. कागदपत्रे वर खाली करून बघणे सुरु होते. त्यांनी नीलेशकडे पाहिले पण तोंडाने बडबड चालू ठेवली कारण कानाशी फोन होता.
"नाही मिळाली? पाठवतो लगेच. अगदी लगेच. तरी, अर्धा तास लागेलच पाठवायला. ती मुलाखत? हो, हो, पाठवतो कोणाला तरी. रंगीत चौकट करू.