माणसे, विश्वास, काम

     जीवन जगताना आपल्याला अमक्याची अमक्या ठिकाणी ओळख आहे,  अमक्यामुळे काम नक्की होणार  असे सांगितले जाते. काही जण अशा माणसांच्या बाबतीत - यांच्या शब्दाला फार मान आहे  - असे सांगतात. काही ओळखीच्या माणसांमुळे काम होणार, असे नक्की वाटू लागते. प्रत्यक्षात अनुभव येतो तो वेगळाच. 

इंगल्स मार्केट

वीसशे पंधरा सालच्या धनत्रयोदशीच्या दिवशी माझी नोकरी सुरू झाली. नोकरीच्या पहिल्या दिवशी जेमिने माझ्या अमेरिकन पासपोर्ट, सोशल सिक्युरिटी आणि स्टेट आयडी या कागदपत्रांच्या झेरॉक्स घेतल्या. काही कागदपत्रांवर माझ्या सह्या घेतल्या. ऑनलाईन काही माहिती भरली आणि माझी नोकरी सुरू झाली. पंचिंगसाठी तिने मला एक नंबर दिला आणि सांगितले हा तुझा यूजर आयडी, पासवर्ड तुला हवा तो घे. शिवाय तिने हेही सांगितले की जेवणाची अर्ध्या तासाची सुट्टी घेशील तेव्हा पण जेवायला जाताना व जेवण झाल्यावर तुला पंचिंग करावे लागेल. कामावर आल्यावर व जातानाही पंच कर असेही सांगितले.

राजीव साने यांची प्रकट मुलाखत

अनेक इझम कोसळत वा भरकटत असताना नव्याने विचारव्यूह बांधण्याचा ध्यास
घेणारे आणि कोणत्याही विषयात खोलवर शिरकाव करणारे राजीव साने एक
व्यक्तिमत्व राजीव साने यांच्या गल्लत गफलत गहजब या पुस्तकाला नुकताच
महारष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल त्या निमित्त
अजय ब्रहमनाळकार
प्रा. संतोष शेलार
पत्रकार निरंजन आगाशे
हे राजीव साने यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहेत. ही एक वैचारिक मेजवानीच आहे असे समजायला हरकत नाही.

स्थळ - निवारा सभागृह, नवी पेठ, एसेम जोशी फाउंडेशन समोर पुणे
दिनांक ४ जून २०१६
वेळ - सायं ५.३०

गडचिरोली - एक वृत्तांत

धनकवडी येथील आदर्श मंडळातर्फे गडचिरोली येथील पोलिस दलासाठी आकाश दर्शन कार्यक्रम  नुकताच पार पडला. ह्या कार्यक्रमास सहायक म्हणून जाण्याचा योग मला आला.

चिंता करी जो विश्वाची ... (७)

श्री समर्थांनी, जनहितार्थ आरंभलेल्या या ज्ञानदान यज्ञाला सामान्य जनांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. समर्थांचा शिष्य परिवार तर विस्तृत होताच, परंतु सर्वसामान्य संसारी लोक देखिल समर्थांकडून ज्ञानबोध घेण्यास आदरपूर्वक येत असत. त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयास करीत असत. त्यांना समजेल, उमजेल अशाच भाषेत समर्थ त्यांना उपदेश देत होते. जीवनाचे मर्म सहजपणे उलगडीत होते. 

चिमनी रॉक

हवा
स्वच्छ आणि सुंदर होती. शिवाय हवेत अजिबातच आर्द्रता नव्हती आणि
म्हणूनच लॉग विकेंडचा प्लॅन बनवला. खरे तर आम्ही  हँगिंग रॉकला जाणार होतो.
तिथे २ वेळा जाऊन आलो होतो.  आम्हाला हा रॉक इतका काही आवडला आहे की
मेमोरिअल डेला वर्षातून एकदा हॅँगिंंग रॉकला जायचेच असे आम्ही ठरवून टाकले
होते. मीच म्हणाले तिथे जायला नको म्हणजे मला पण तो रॉक आवडतोच पण तिथले
सर्व फोटो घेऊन झाले आहेत  आणि ट्रीप ला जायचे आणि फोटो काढायचे नाहीत!  
चिमनी रॉकला जायचे ठरवत होतो. अजून दुसरी ठिकाणेही बघत होतो. तसे तर नॉर्थ
कॅरोलायना सर्व पालथा घातला आहे.

प्रतिभा (भाग २)

                                  तिच्या नजरेतला कोरडेपणा मला तुच्छतादर्शक वाटल्याने मी घाबरून सॉरी म्हणालो आणि हात काढून घेतला. यापेक्षा 

जास्त बोलणं म्हणजे कोणत्याही अनपेक्षित  कृतीला आमंत्रण देणे ठरले असते. मलाही थोडी चीड आली. इतकंही कोणी कोरडेपणाने वागत नाही. लवकरच दरवाज्याशी लिफ्टमन आला  आणि त्याने त्याच्या जवळच्या किल्लीने लिफ्टचा दरवाजा उघडला.

चिंता करी जो विश्वाची ... (६)

समर्थांची श्रीराम भक्ती अतुलनीय अशीच होती . रामावर अतीव श्रद्धा आणि विश्वास. संकटकाळी तो कोदंडधारी सदैव तुमच्या रक्षणास येईल असे ते श्रोत्यांना सांगत असत. परंतु त्यासाठी तुमचे वर्तन देखील नेटके आणि नेमस्त असले पाहिजे. ते श्रोत्यांना सांगत, की मनुष्य देहाचा मोह बाळगून जन्मभर त्याचीच चिंता वाहिली, तरी काळ आपले कर्तव्य करायचे चुकणार नाहीच. मग अशा नश्वर देहाची, आयुष्याची चिंता करण्यापेक्षा श्रीरामाची भक्ती करण्यात तो काळ व्यतीत  करावा, म्हणजे मृत्यू तुम्हांस भयभीत करणार नाही.