श्री रामदास स्वामींनी आरंभलेला ज्ञानयज्ञ, अखंड प्रज्वलीत होत होता. ज्ञानसंपन्न, साधनासंपन्न असलेले समर्थ, समाजातील अनेक लहानसहान बाबींचा देखिल बारकाईने विचार करीत होते. आपल्या ज्ञानाच्या, अनुभवांच्या आणि शहाणपणाच्या तराजूमध्ये तोलत. होते. योग्य काय आणि अयोग्य काय यांची परिमाणे लोकांना शिकावीत होते . त्यांची तीक्ष्ण बुद्धी, हितकारी आणि अहितकारी गुणदोषांना पारखत होती. त्यातील हीण काय आहे, आणि शुद्ध कांचन कुठले , हे वेगळे करून सांगत होती.