बेल वाजताच ज्योती चौधरी खुर्चीवरून उठल्या. हातातील मासिक ठेवले. हळुहळू चालत दारापर्यंत आल्या. घरातच घसरून पडल्याने त्यांचा डावा पाय दुखावला होता. दार उघडताच समोर एक मुलगी दिसली. पंजाबी ड्रेस. गव्हाळ वर्ण.
"ओळखलंत बाई? मी दीपिका."
बाईंना ओळख पटेना.
"मी दीपिका, बाई. दीपिका सुभेदार."
"तुम्ही आत या, अशा उन्हात उभ्या राहू नका."
बाईंनी दीपिकेला आत घेतले.