प्रवास मनापासून करायला आवडतो कुठेही, कसाही, केव्हाही, कितीही! त्यामुळे प्रवास वर्णनेही खूप वाचली जातात. असाच मायबोलीवरचा ( दुवा क्र. १
) हा लेख वाचनात आला अन विचारचक्र सुरू झालं. टू बी ऑर नॉट टू बी! एक
खूप आवडीच वाक्य आहे 'वी डोंट नो व्हॉट वुई कॅन डू टिल वुई ट्राय
इट'.... आणि एक दिवस नोंदणी करून टाकली. हुश्श! पाठ्यपुस्तकातील
विज्ञानाशी संबंध सुटून अनेक दशकं उलटली..