भटकंती (ठाणे ते शेगाव)

मागील वर्षी ऑगस्टमध्ये आमचे शेगावला जायचे ठरले होते. पण भरपूर पाऊस असल्याने जायचे टाळले होते. नंतर मला कामातून वेळ मिळत नसल्याने ह्याबाबत जास्त विचार करता आला नाही. आता १० एप्रिलला गुडफ्रायडे, शनिवार व रविवार असे ३ दिवस सुट्टी मिळत होती. त्यामुळे मग ह्यावेळी जायचे ठरविले. एक दोघांच्या सांगण्यावरून रेल्वेने जाणे सोयिस्कर पडेल असा सल्ला मिळाला. एखादी कार भाड्याने घेउन जावे असे माझे मत होते. एकच आठवडा असल्याने रेल्वेचे तिकिट मिळण्याची शक्यता नव्हतीच. तरीही रेल्वेच्या संकेतस्थळावर पाहिले तर सर्व वर्गाची तिकिटे वेटिंग लिस्ट मध्ये.

काही नोंदी अशातशाच... - ३

संकेतस्थळ संचालनाच्या मर्यादा ध्यानी घेऊन या लेखनात कोणाचाही नामोल्लेख केलेला नाही. नामोल्लेखाने मिळणाऱ्या संदर्भचौकटीने न्याय-अन्याय अधिक गंभीर वगैरे ठरत नाही, इतके निश्चित.
 

सामाजिक संस्था - माहिती /संपर्क

परिचयातील अनेकांकडून सामाजिक संस्थाना आर्थिक/वस्तुरुपाने मदत करण्याची इच्छा व्यक्त केली जाते. पण संपर्काअभावी ही माहिती उपलब्ध नसते. तरी वृद्ध/लहान मुले /शिक्षण या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या आणि वरील मदत स्वीकारणाऱ्या संस्थांबद्दल माहिती (काम/संपर्क इ. ) असल्यास कृपया कळवावे.

धन्यवाद

मनोगत आता चालता बोलता अर्थात मोबाईलवर मनोगत !

प्रिय मनोगतींनो,
अशातच मी नवीन मोबाईल खरेदी केला - नोकिया ई-६३ , आणि त्यावर ऑपेरा मिनी ब्राऊसर चढवला, आणि महाजालावर भटकताना असे लक्षात आले की, युनिकोडीत देवनागरी अगदी सुरेखपणे त्यात दिसते आहे - लगेच मनोगतावर आलो, तर काय अगदी व्यवस्थीत वाचता आले ! तेव्हा म्हंटले सर्वांना ही बातमी सांगून टाकावी झालं!

तेव्हा ज्या मनोगतींकडे नोकिया चे सिरिज-६० ( २ रा वैशिष्ट्य समूह) फोन आहेत, आणि महाजालाची जोडणी आहे, ते मनोगत कुठेही वाचू शकतात - ऑपेरा मिनि चकटफू मिळतो बर्का !

तृषार्त


'कबीर बानी'

पंडित कुमार गंधर्व यांच्या विलक्षण प्रतिभेतून साकारलेल्या निर्गुणी भजनांचा एक नवा अल्बम घेऊन नव्या दमाचे गायक राहूल देशपांडे रसिकांच्या भेटीला येत आहेत. सानिया मिडिया या संस्थेचा हा संगीताच्या विश्वातील पहिला प्रकल्प आहे. 'कबीर बानी - म्युझिक फॉर सोल' असे या अल्बमचे नाव असून अल्बमचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले असून, मे महिन्याच्या उत्तरार्धात त्याचे प्रकाशन पुण्यात केले जाणार आहे.

या अल्बमविषयी राहूल देशपांडे यांनी सांगितले की, निर्गुणी भजने ही खास भारतीय परंपरा. कबीर आणि त्यांच्या समकालीन संतांनी केलेल्या रचना त्यात मोडतात.