बोक्या येतोय


बोक्या सातबंडे बहुदा ८४-८५ च्या दरम्यान आकाशवाणी मुंबईवर ऐकलेला कार्यक्रम आता चित्रपटाद्वारे आपल्या समोर येतोय. दरम्यान २-३ पिढ्या निघून गेल्या आहेत त्यामुळे आपल्याला असलेली उत्सुकता आताच्या लहान मुलांना पडेल का? आपल्याला आवडलेला "बोक्या" आजच्या मुलांना आवडेल का ?

दिलिप प्रभावळकरांच्या लेखणितून उतरलेला "बोक्या" चित्रपटाद्वारे पुढच्या आठवड्यात येतोय... त्याला शुभेच्छा !!!!

संदर्भ : -लखलख चंदेरी दुनियेत मराठी पाऊल पडले पुढे..! एकाच दिवशी झळकणार पाच मराठी चित्रपट... (लोकसत्ता १६ एप्रिल ०९)

कुमठा नाका २

         औरंगाबादला परत आल्यावर दोनतीन दिवसांनी ट्रकमध्ये सामान भरून निघायचे असे आम्ही ठरवले. बदलीप्रमाणेच सामान हलवण्याचाही आमचा हा पहिलाच अनुभव होता.अरविंद तर औरंगाबादचा म्हणजे मराठवाड्यातीलच होता त्यामुळे अजूनही त्याच्या गावी त्याचे घर होते शेतीवाडी होती.याउलट आमचे म्हणजे आता माझे अगदी विंचवाचे बिऱ्हाडच होते.

हे जीवन सुंदर आहे....!

मी एक बँक अधिकारी म्हणून म्हणून निवृत्त झालो. दीर्घकाळ शाखा व्यवस्थापक होतो. कर्जे देणे हा नित्याचा व्यवहार. अनेकदा कर्ज वितरणानंतर संबंधित कर्जदार पुनश्च शाखाधिकाऱ्यांच्या कक्षात यायाचा. विचारायचा-" साहेब कर्ज मिळाले. आता तुमचे किती?" मी त्याच्यावर मूळीच रागवयचो नाही. म्हणायचो, " बाबारे, मला काय द्यायचे ते बँक देते, तेवढे पुरेसे आहे. अणखी काही देशील तर माझी आज छान लागणारी झोप नाहीशी होईल. ती तू हिरावू नकोस. कर्जाचे म्हणशील तर , घेतलेल्या कर्जाचा योग्य वापर कर; दिलेल्या हप्त्यांनुसार नीट परतफेड कर म्हणजे झाले.

एक प्रवास!

टन.. टन... टन... (कसलातरी कर्कश आवाज)..... मी कसेबसे डोळॅ किंचित उघडले आणि हात आजुबाजुला फिरवून मोबाईल शोधला. कसातरी एकदाचा मोबाईल हाती लागला. पापणी किंचीत वर करून त्यात वेळ बघितली. ७:३०मिनिटे.

भारतीय मान्सून दीड कोटी वर्षांचा

उन्हाळ्याच्या काहिलीने हैराण झालेल्या भारतीयांना आता मान्सूनचे अर्थात पावसाळ्याचे वेध लागले आहेत. कधी एकदा पाऊस सुरू होतो, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतात पहिल्यांदा अंदमान-निकोबार आणि केरळमध्ये मान्सून दाखल होतो आणि नंतर तो संपूर्ण भारतात पसरतो, असे आपल्याला माहिती आहे. भारतीय उपखंडातील हा मान्सून अर्थातच मोसमी वारे आणि त्याविषयीची एक बातमी नुकतीच वाचनात आली. आज त्याविषयी थोडक्यात.
भारतीय मान्सून गेल्या दीड कोटी वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे पुरावे संशोधनातून मिळाले असल्याचे या बातमीत म्हटले आहे. म्हणजे आपल्या भारतातील पावसाचे वय दीड कोटी वर्ष आहे, असे म्हणता येईल.