१. रोज तुम्ही प्रभूपाशी पेढे बर्फी नवा खवा खावा/
परी म्यां एके दिवशी रेवडीचा स्वाद का न चाखावा?
मोरोपंतांची ख्याती आर्यांसाठीच! असे सांगतात, की त्यांनी लिहलेली ही पहिली आर्या. ते सहसा देवालयात जात नसत. एकदा कोणी रेवडीकर नावाचे कीर्तनकार आले होते, त्यांचे कीर्तन ऐकण्यास मोरोपंत गेले. नेहमी येणाऱ्यांनी 'आज इकडे कसे' असा प्रश्न केला असता मोरोपंतांनी म्हणे वरील उत्तर दिले.
२. भू, जल तेज, समीर ख, रवी-शशी काष्ठादिकी असे भरला/
स्थिरचर व्यापूनी अवघा तो जगदात्मा दशांगुले उरला/